Dainik Maval News : आनंद महिला मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात 250 जणांची तपासणी करण्यात आली. आनंद महिला मंडळ लोणावळा व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने येथील जैन स्थानकात आयोजित शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 150 लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर 25 लाभार्थ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. आनंद महिला मंडळ अध्यक्षा संगीता भुरट, जैन स्थानकाचे संतोष चोरडिया, गिरीश पारख, विनोद लुंकड, जितेंद्र छल्लाणी, किशोर पारख, अक्षय कांकरिया आदी यावेळी उपस्थित होते.
विठ्ठलराव वरुडे पाटील व माय माउली केअर सेंटर यांचे या उपक्रमास विशेष सहकार्य लाभले. प्रकल्प प्रमुख साधना टाटिया, सविता भुरट, निर्मला लुणावत, छाया सोनीगरा, सुमिती लुणावत, आशा चोरडिया, ज्योती पारख, वंदना ओसवाल आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले. स्व. देवेंद्रकुमार टाटीया यांच्या स्मरणार्थ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच