दिनांक 26 जून हा दिवस दरवर्षी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. नशेमध्ये अडकलेल्या लोकांचे जीवन वाचवणे, समाजात जागरूकता करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे. आज (सोमवार, दिनांक 26 जून) या दिनाचे औचित्य साधून कामशेत पोलिसांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास नेहरू माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज कामशेत शहर इथे संकल्प नशा मुक्ती अभियानांतर्गत परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करून जनजागृती केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी ( दिनांक 26 जून) आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त संकल्प नशा मुक्ती अभियान अंतर्गत या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कामशेत शहर येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग, लोणावळा चे सत्यसाई कार्तिक (IPS) यांच्या मार्गदशनखाली कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजय जगताप, सपोनि आकाश पवार यांनी संकल्प नशा मुक्ती अभियानांतर्गत परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करून जनजागृती केली. ( 26 June International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking Program by Kamshet Police Maval )
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचा उद्देश
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन हा दिवस पाळण्यामागे जगभरातील खासकरून लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी हा उद्देश असतो. जगभरातील शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणे आणि सार्वजनिक ठिकाणी या विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच ड्रग्ज आणि त्याच्या सेवनाच्या जोखमीविषयी माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचा इतिहास
डिसेंबर 1987 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केला. हा दिवस अंमली पदार्थांचे सेवन एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आयोग्यावर कसे दुष्परिणाम करते, यामुळे एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य कसे बिघडू शकते याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! लोणावळा रेल्वे स्थानकावर इंजिनिअरिंग ब्लॉक, दुपारच्या सत्रातील ‘या’ लोकल रद्द
– खंडाळा टँकर अपघात : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी बाळा भेगडेंनी घेतली वरे-पोशिरे कुटुंबीयांची भेट