पवन मावळसह तालुक्यातील अन्य भागातील नागरिक, व्यवसायिक यासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड च्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे असलेले पवना धरण सध्या 30.59 टक्के इतके भरले आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याची आवक घटली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात अत्यंत मंदगतीने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात पवना धरण भागात अवघ्या 2 मीमी पावसाची नोंद करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवना धरणातून मावळ तालुक्यातील अनेक गावांतील सर्वसामान्य नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी तर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. 1972 साली पवना धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. तसेच धरण भागातील बहुतांश लोक याच पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे धरण लवकरात लवकर शंभर टक्के भरणे, पावसाचा जोर वाढावा अशी सर्वांचीच प्रार्थना आहे. ( 30 percent water storage in Pavana Dam Rain Update )
गुरुवार – दिनांक 13 जुलै पर्यंत पवना धरणाच्या पाण्याची स्थिती
24 तासात झालेला पाऊस (13 जुलै सकाळी 6 पर्यंत) – 2 मीमी
1 जून पासून झालेला एकूण पाऊस – 646 मीमी
धरणातील सध्याचा पाणीसाठा – 30.59 टक्के
मागील वर्षी आजच्या तारखेला धरणातील पाणीसाठा – 42.18 टक्के
अधिक वाचा –
– पवन मावळ भागात आधुनिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात, वारू गावातील शेतकऱ्यांची चारसूत्री पद्धतीला पसंती
– वडगावमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजनेचे अर्ज भरणे आणि E-KYC करण्याची सुविधा