व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! मावळ तालुक्याला मिळाले मोठे गिफ्ट, ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी तब्बल 333 कोटींचा निधी

मावळ तालुक्यातील निसर्ग संपदा लक्षात घेता या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.पर्यटन विकास आणि निसर्ग पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 13, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
glass-skywalk-project-lonavla

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक प्रकल्प उभारण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 333 कोटी 56 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘पर्यटनाच्या दृष्टीने मावळातील महत्त्वाचा असणारा ग्लास स्कायवॉक या दुरदर्शी प्रकल्पासाठीचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे.हा प्रकल्प पर्यटकांच्या कुतुहलाचे आकर्षण ठरणार आहे.यामुळे पर्यटकांची वाढ होऊन तालुक्यातील पर्यटनावर आधारित व्यवसाय आणि स्थानिकांचे रोजगार यामध्ये देखील वाढ होणार आहे.’ – आमदार सुनिल शेळके

मावळ तालुक्यातील निसर्ग संपदा लक्षात घेता या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.पर्यटन विकास आणि निसर्ग पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सर्वप्रथम 2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये (11 मार्च 2022) अर्थमंत्री अजित पवार यांनी लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर 21 सप्टेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प उभारण्याबाबत सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.पीएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

सुमारे 4.84 हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यामध्ये परिसर विकासासह भुशी डॅम ते लायन्स पॉईंट रस्ता रुंदीकरण, 120 मीटर लांब व 6 मीटर रुंद ग्लास स्कायवॉक, लायन्स व टायगर पॉईंट जोडणाऱ्या दरीवरील पूल, झिप लाईन, बंजी जम्पिंग, वॉल क्लायबिंग सारखे साहसी खेळ, 1000 व्यक्तींकरिता ॲम्फी थिएटर, फूड पार्क, वाहनतळ, प्रकाश व ध्वनी शो तसेच पर्यटकांसाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात पर्यटकांच्या सुरक्षेला आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. हा प्रकल्प झाल्यास या परिसरात पर्यटकांची वाढ होऊन तालुक्यातील पर्यटन क्षेत्रावर आधारित स्थानिकांचे उद्योग-व्यवसाय आणि रोजगार यामध्ये देखील वाढ होणार आहे.

ह्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल राज्य सरकारचे तसेच सहकार्य केलेले सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व ग्रामस्थांचे आमदार सुनिल शेळके यांनी आभार व्यक्त केले आहेत. ( 333 crore fund for glass skywalk project at Tiger Point Lonavala Maval MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– तिकोणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा सुतार बिनविरोध । Gram Panchayat Election
– मोठी बातमी! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात? नागपूरमध्ये मोठा राडा – पाहा Live व्हिडिओ
– ‘मावळचा जलनायक’ रिल्सचा प्रथम क्रमांक! आदित्यराजे मराठे ठरला ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय रिल्स स्टार’ । Sunil Shelke Birthday


Previous Post

हिवाळी अधिवेशनातून मावळ तालुक्याला मिळणार मोठी गुड न्यूज! मावळवासियांची उत्कंठा शिगेला, कोणती घोषणा होणार?

Next Post

काले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता कालेकर आणि नामदेव कालेकर बिनविरोध

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kale-Society-election-maval

काले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता कालेकर आणि नामदेव कालेकर बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.