व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News

तळेगाव दाभाडे शहरातील बामणडोह ही विहीर सुमारे ३०० ते ३५० वर्ष इतकी पुरातन आहे. विहिरीचा आकार बऱ्याचअंशी महादेवाच्या पिंडी सारखा भासतो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 3, 2025
in लोकल, मावळकट्टा, शहर
350 years old Bamandoh well in Talegaon Dabhade city will be conserved

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषद, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि भटकंती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील बामणडोह या विहिरीचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्यानुसार सर्वात आधी विहिरीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच विहिरीच्या परिसरात वाढलेले गवत देखील काढून घेण्यात आले. विहिरीची आंतरिक सफाई करत असताना पाण्यावर तरंगणारा कचरा प्रथमतः उपस्थितांच्या समन्वयाने काढून घेण्यात आला. या सोबतच विहिरीच्या पाण्यातील गाळाचा विद्युत यंत्राच्या साहाय्याने उपसा करण्यात आला.

प्रसंगी भटकंती ग्रुप, शिव प्रतिष्ठान ग्रुप, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमबजावणी करण्याच्या हेतूने जल या पंचतत्वांतर्गत बामणडोह या ऐतिहासिक विहिरीचे जतन व संवर्धन करण्याचे नियोजित करण्यात आले. या सोबतच मुख्याधिकारी यांनी शहरातील अन्य ऐतिहासिक विहिरीचे पुनर्जीवन करण्याबाबतचा कृती आराखडा तयार केला आहे.

तळेगाव दाभाडे शहरातील बामणडोह ही विहीर सुमारे ३०० ते ३५० वर्ष इतकी पुरातन आहे. विहिरीचा आकार बऱ्याचअंशी महादेवाच्या पिंडी सारखा भासतो. या ठिकाणी अजूनही मोटा वरती बैलांची धावपट्टी व दगडी पाण्याचा पाट असण्याची खूण मिळते. सदर विहिरीस राज वारसा असल्या कारणाने ऐतिहासिक वास्तू जपणे ही काळाची गरज आहे. त्याच अनुषंगाने तळेगाव दाभाडे शहरातील भटकंती ग्रुप, शिव प्रतिष्ठान ग्रुप, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या अथक प्रयत्नाने बामणडोह या विहिरीचे जतन व संवर्धन करण्यात आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News
– कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade
– चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News


Previous Post

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनांचे अनुदान यापुढे ‘डिबीटी’ प्रणालीद्वारे मिळणार

Next Post

मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gift of Digital Interactive Smart Board to Paranjape Vidya Mandir School in Talegaon

मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke attention in session regarding issues in Dehuroad Cantonment area

रेडझोनचा प्रश्न, शिक्षण – आरोग्य – पाण्याची समस्या ; देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात लक्षवेधी

March 12, 2026
Agriculture Minister Dattatreya Bharane

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेणार – कृषी मंत्री

March 12, 2026
Katkari community gets benefit of Rs 2 lakh 39 thousand from government for building house with toilet

शौचालय सहीत घरकुल बांधणीसाठी कातकरी समाजाला सरकारकडून मिळतो २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ

March 12, 2026
Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

पुणे, नागपूर सहीत ‘या’ ११ जिल्ह्यात नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.