महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबतचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्यात नागरिकांच्या सूचनांचाही समावेश केला जाईल. आराखडा पूर्ण होताच निविदा प्रसिद्ध करुन गडावर पाणी, स्वच्छातगृह, वाहनतळ, पाय-या दुरुस्त, दर्शन शेड अशा सुविधा भाविकांना देण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. ( 40 Crore DPR For Development Of Karla Ekvira Devi Temple Complex Information Given By MP Shrirang Barane )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्ला गडाच्या विकासासाठी वनविभागाची जागेची आवश्यकता आहे. त्यानुसार खासदार बारणे यांनी आज (मंगळवारी) जिल्हा वनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके, सतीश स्रावगे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह सकाळपासून पाहणी केली. मावळमधील वनविभागाची जागा विकासासाठी देण्यासंदर्भात अधिका-यांना सूचना दिल्या. भाजपचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, अंकुश देशमुख, सुनील हगवणे, दत्ता केदारी, विशाल हुलावळे, मिलींद बोत्रे आदी उपस्थित होते.
हेही वाचा – अरे व्वाह..! आता अवघ्या 3 मिनिटात श्री एकविरा देवीच्या गडावर जाता येणार, वाचा सविस्तर
खासदार बारणे म्हणाले, ”कार्ला गडावर राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. गडावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह नाही. पाय-यांची दुरावस्था झाली असून वाहनतळाची व्यवस्था नाही. सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांचे हाल होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई एकविरा देवी मंदीर परिसराच्या विकासासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून 40 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्याचा आराखडा तयार केला जात आहे. मंदिर परिसरात वनखात्याची जागा आहे”.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर विकासासाठी राज्याचे @CMOMaharashtra @DrSEShinde यांनी MSRDC च्या माध्यमातून ४० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला या बाबत आज आधिकाऱ्यां समवेत मी एकवीरा देवी पायथा मंदिर परिसराची पाहणी केली. pic.twitter.com/BaOnW7C8Lf
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) January 24, 2023
”भाविकांची वाहने पार्क करण्यासाठी वनखात्याची जागा देण्यास वन विभागाने तत्वता मान्यता दिली. त्यामुळे वाहनतळाची सुविधा होईल. एकविरा देवीकडे जाणा-या पाय-यांची दुरुस्ती केली जाणार आहे. गडावर जाण्यासाठी रोप-वे केला जाणार आहे. त्याचा भाविकांना फायदा होईल. या सुविधा निर्माण करण्यासाठी वन विभागाची जागा घेतली जाणार आहे. वाहनतळ, स्वच्छातगृह उभारणे, भाविकांना सुविधा देण्याचे काम हाती घेतले आहे. छोट्या व्यावसायिकांना वनखात्याच्या जागेत जागा उपलब्ध करुन देण्याची आराखड्यात तरतूद केली आहे. निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच त्यासंदर्भातील कामाच्या निविदा प्रसिद्ध होतील. आगामी काही दिवसात कामे पूर्ण होतील. एमएसआरडीसीच्या माध्यमातून एकविरा देवी परिसराचा कायापालट होईल”, असेही खासदार बारणे म्हणाले.
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात शिवसेनेकडून विविध समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती उत्साहात साजरी
– मावळच्या दोन तरूणांची जबरदस्त कामगिरी; तालुक्यात आढळणाऱ्या 36 जातीच्या सापांबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध, नक्की वाचा