Dainik Maval News : लोणावळा शहर आणि परिसर वर्षाविहारासाठी जगप्रसिद्ध आहे. जगभरातून पर्यटक लोणावळा येथे पावसाळी पर्यटनाठी येत असतात. दरम्यान मावळ तालुक्यात पडणाऱ्या पावसातही लोणावळा परिसरात सर्वाधिक पाऊस पडत असतो. यंदा पावसाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केलेली आहे. लोणावळ्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत विक्रमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामात मान्सूनने आपलाच रेकॉर्ड मोडला आहे. शनिवारी (दि.28) सकाळी घेतलेल्या आकडेवारीनुसार लोणावळ्यात चालू हंगामात एकूण 5822 मिमी पाऊस झाला आहे. जो गतवर्षीपेक्षा 1300 मिमीहून अधिक आहे. अद्याप हंगाम पूर्ण झालेला नसून ही आकडेवारी वाढू शकते. तसेच सध्या शहर परिसरातील सर्व धरणे भरली असून वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या 24 तासात शहर परिसरात तब्बल 155 मीमी पाऊस नोंदविण्यात आला असून आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मावळात यंदा वरुणराजा चांगलाच बरसत आहे. डोंगराळ प्रदेश असलेल्या मावळ तालुक्यात यावर्षी जोरदार मान्सून पाऊस झाला. तसेच परतीचा पाऊसही जोरदार कोसळत आहे. लोणावळा, पवना परिसर सह मावळातील आंदर मावळ, नाणे मावळ, तळेगाव – वडगाव विभाग येथेही चांगला पाऊस झाला असून सध्याही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी सुरु आहेत.
पवना धरण शंभर टक्के भरले –
पिंपरी चिंचवड महानगरासह मावळातील अनेक गावांची तहान भागविणारे आणि उद्योगधंद्यांची पाण्याची गरज पूर्ण करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रातही यंदा विक्रमी पाऊस झाला आहे. यंदा दिनांक १ जूनपासून नोंदविलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार गतवर्षीपेक्षा 250 हून अधिक मिमी पाऊस झालाय.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– हिंदू राष्ट्र सेना संघटनेची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, धनंजयभाई देसाई यांची प्रमुख उपस्थिती । Maval News
– महाराष्ट्रातील 11 गडकिल्ल्यांवर एकाचवेळी स्वच्छता मोहीम ; युनेस्कोचे शिष्टमंडळ करणार गडांची पाहणी । Maval News
– पुणे ते बंगळुरू बायपास मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार ! नितीन गडकरी यांचा मेगा प्लॅन, चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती