सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावरील शोभेच्या दारूचा कारखाना आहे. तिथे आज (1 जानेवारी 2023) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला आणि स्फोटाचे आगीत रुपांतर झाले. या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची आणि 20 ते 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ( 6 Death Due To Blast In Firecracker Factory At Barshi Solapur )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
#बार्शी तालुक्यातील पांगरी येथील फटाके कारखान्यात स्फोट pic.twitter.com/ZkyDAqdau4
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 1, 2023
स्फोट झाला तेव्हा फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते. त्यापैकी 5-6 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 20-25 जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पांगरी येथील फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याने भीषण आग लागली. ही आग विझविण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहेत. तर जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– नववर्षाचे दणक्यात स्वागत! मावळ तालुक्यात पर्यटकांचा महापूर, पर्यटनस्थळी 2023 चे जल्लोषात वेलकम । Happy New Year 2023
– कोरोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट समोर, लस घेतली असेल तरीही होऊ शकते लागण, वाचा अधिक