Dainik Maval News : स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मावळ तालुक्यातील इंदोरी येथील भुईकोट किल्यावर ‘भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान’ या संस्थेच्या ‘दुर्ग तेथे भगवा’ या संकल्पनेतून मावळ तालुक्यातील सर्वात उंच 61 फूट उंचीचा भगवा ध्वज लोकार्पण सोहळा गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.
- मावळ तालुक्यातील इंदोरी भुईकोट किल्ला हा तळेगाव- चाकण मार्गावर, इंद्रायणी नदीच्या तिरावर वसलेला किल्ला. अनेकांसाठी हा गड अपरिचित आहे. मावळ तालुक्यात अनेक गिरीदुर्ग आहेत. मात्र, भुईकोट गडांमध्ये हा एकटाच गड आहे. गडाला झाडा-झूडपांचा वेढा, पडझड अवस्था झाल्याने या गडाला संवर्धनाची आवशक्यता होती. गेल्यावर्षीपासून या किल्ल्याचे संवर्धन कार्य ‘भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान’च्या वतीने चालु आहे.
लवकरच या किल्ल्याचे रूप पालटणार असून किल्ल्याच्या संवर्धनाबरोबर एक भगवा ध्वज उभारण्याचे काम येथील प्रतिष्ठानने केले असून ध्वजाचा लोकार्पण सोहळा सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे वंशज श्रीमंत वृषाली मासाहेब दाभाडे सरकार, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, सत्यशीलराजे दाभाडे सरकार यांच्या हस्ते संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला इंदोरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे, इतिहास अभ्यासक मारुती आबा गोळे, इतिहास संशोधक प्रमोद बोऱ्हाडे , शिवभक्त विजय तिकोने, सचिन शेडगे, दिपक दाभाडे, दिव्या गांगट, सागर दळवी आदी उपस्थीत होते. याप्रसंगी शिव व्याख्याते दिगंबर पडवळ यांचे व्याख्यान संपन्न झाले. लक्ष्मण शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अनेक दुर्गसंवर्धन संस्था उपस्थीत होत्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade