Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवन मावळातील पवना धरणात सद्यमितीस 62.08 टक्के पाणीसाठा आहे. 15 जुलै पर्यंत हा पाणीसाठा पुरेल, तरीही नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यात उन्हाचा चटका वाढला आहे. पवना धरण परिसरातही उन्हाची तीव्रता वाढत असून यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले आहे. यामुळे धरणातील पाणी पातळी घटू लागली आहे.
- पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायत व नगरपरिषदेला पाणी दिले जाते. सध्या पवना धरणात 62.08 टक्के पाणीसाठा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 60.93 टक्के पाणीसाठा हाेता. त्यामुळे यंदा गतवर्षापेक्षा 1.15 टक्के इतका अधिक पाणीसाठा धरणात शिल्लक आहे.
पवना धरणात 62.08 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा 15 जुलैअखेरपर्यंत पुरेल. उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा – रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News