पुणे जिल्हा नियोजन समिती फंडातून चिखलसे ग्रामपंचायतला सुमारे 73 लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. सरपंच सचिन काजळे यांच्या पाठपुराव्याने आणि बाळा भेगडे यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून पार पडणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवार (दिनांक 17 जून) रोजी पार पडले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ही कामे तत्काळ सुरु होणार असून लवकरच पूर्णत्वास जातील, अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माजी आमदार बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, ज्येष्ठ नेते शांताराम काजळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, सरपंच सचिन काजळे, उपसरपंच सविता काजळे, सदस्य संतोष शेंडगे, वैशाली काजळे, स्वाती पाराटे, नगरसेवक किरण म्हाळस्कर, राजेंद्र सातकर तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ( 73 lakhs fund from Pune District Planning Committee to Chikhalse Gram Panchayat )
अधिक वाचा –
– आठवडे बाजारात होणारी मोबाईल चोरी रोखा, तळेगाव भाजपाचे पोलिसांना निवेदन
– ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या । दैनिक मावळ विशेष