Dainik Maval News : ग्रामपंचायतची नवीन 500 मीटर लांबीची 80 हजार रुपयांची केबल चोरीला गेली. ही घटना रविवारी (दि.22) ते सोमवारी (दि.23) या दरम्यान चांदखेड (ता. मावळ) येथे घडली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ बाळू केदारी (वय 34, रा. चांदखेड) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ग्रामपंचायतीचा सरकारी पंप हाऊस चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पंपिंग हाऊस ते पवना नदीच्या विहिरी पर्यंत टाकलेली 500 मीटर लांब, 80 हजार रुपये किमची नवीन केबल अज्ञात चोराने चोरून नेल्याचे दिसून आले. यावरून शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अधिक वाचा –
– पूररेषेत बांधकामे होत असताना डोळेझाक प्रशासनाने केली, त्याची शिक्षा सर्वसामान्य गरिबांना का? – खासदार श्रीरंग बारणे । Pimpri Chinchwad News
– आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आंदर मावळातील विकासकामांचे भूमिपूजन । MLA Sunil Shelke
– सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना लाभांश जाहीर; मनोहर दाभाडे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार

