पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकी प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संभाजी शिंदे आणि उपसभापती नामदेवराव शेलार यांचा सत्कार करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सभापती संभाजी शिंदे आणि अन्य मंडळी यांनी यावेळी अजित दादांना मावळ बाजार समितीच्या प्रास्ताविक कामासंदर्भात निवेदन दिले. बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील, अजित पवार आदी मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ( maval bajar samiti chairman sambhaji shinde honored by ajit pawar )
आमदार सुनिल शेळके, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बबनराव भेगडे, गणेश खांडगे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, दिपक हुलावळे, चंदुशेठ दाभाडे, सुनिल दाभाडे, रामदास वाडेकर, सचिन शिंदे आदी जण यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– किन्हई गावात राष्ट्रवादीकडून ‘एक तास पक्षासाठी’ कार्यक्रम; कार्यकर्त्यांकडून आमदार शेळकेंसाठी मरीमाता मंदिरात यज्ञ
– मावळ तालुका वारकरी मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका निकम, पाहा संपूर्ण कार्यकारिणी