तळेगाव दाभाडे शहराजवळील घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवार ( दिनांक 4 जून ) रोजी रात्री पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार समोर आला. याप्रकरणी सहाय्यक फौजदार एस. बी. तोडमल यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवकाच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणेतीन वाजण्यापूर्वी घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ (किमी 160/22/24) अनोळखी युवकाचा धावत्या रेल्वेची (गाडी नं. 11005) धडक बसल्याने मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख पटलेली नसून त्याच्या वर्णनानुसार त्याची ओळख पटल्यास अथवा नातेवाईकांचा शोध लागल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत. ( an unidentified youth died after being hit by train near ghoravadi railway station )
मृत युवकाचे वर्णन – अनोळखी पुरूष, वय अंदाजे 25 वर्षे, उंची 5.42 फूट, अंगाने सडपातळ, रंगाने गहुवर्ण, चेहरा गोल, कपाळ उंच, डोक्याचे केस काळे, दाढी वाढलेले व मिशी केलेली, उजव्या दंडावर टॅटू, हातावर विशर अजय असे गोंदलेले आहे. त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा ठिपके असलेला डिझाईनचा फुल बाहयाचा शर्ट, निळया रंगाची जिन्स, असे त्याच्या अंगावरील कपडे व इतर वर्णन आहे.
अधिक वाचा –
– वडगावातील श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या पारदर्शक कार्याचा आदर्श वारकरी संप्रदायाने घ्यावा – खासदार बारणे
– मावळ तालुका वारकरी मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका निकम, पाहा संपूर्ण कार्यकारिणी