हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे शहरात मावळ तालुक्यातील महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व तळेगाव दाभाडे नगरपरिषद, हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे शहरात हे प्रदर्शन पार पडले. मावळ तालुक्यातील अनेक महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला आणि आपली उत्पादने विक्रीसाठी आणली होती. दिनांक 4 व 5 जून 2023 रोजी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ( women self help groups products exhibition at talegaon dabhade city )
विविध प्रकारचे पापड, मसाले, मध, पनीर, तूप, विविध प्रकारची पीठे, साडी फॉल, अगरबत्ती, धूप, आयुर्वेदिक साबण इ. प्रकारची उत्पादने याठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. हॅण्ड इन हॅण्ड इंडिया यांकडून मावळ तालुक्यातील अनेक महिला बचत गटांना मशिन व साहित्य यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. तसेच अनेक प्रकारची उत्पादने तयार करण्याठी प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्यात आले आहे.
हेही वाचा – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा एआयआरआयए आणि आरसीपीएसडीसी अस्थापनाशी करार
सदर प्रदर्शन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा महिला उद्योजिकांचे सक्षमीकरण करणे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, या माध्यमातून त्यांची समाजामध्ये वेगळे स्थान आणि ओळख निर्माण व्हावी हा होता. तसेच याद्वारे ग्राहकांना स्वच्छ व निर्भेळ उत्पादने उपलब्ध झाली.
कार्यक्रमासाठी हॅण्ड इन हॅन्ड इंडिया या संस्थेकडून अनिल पिसाळ, रवींद्र काळोखे (तळेगाव दाभाडे नगरपरिषद), परमेश्वर कांबळे, ओंकार कुलकर्णी, अभिजित अब्दूले, सारिका शिंदे, रत्ना आंबेकर, मोहन सोनवणे, शेखर खराडे व पंढरीनाथ बालगुडे इत्यादी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– इंदोरी ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी, गावातच होणार सुसज्ज तलाठी कार्यालय, इमारतीचे भूमिपूजन संपन्न
– ‘मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करा’ – खासदार सुप्रिया सुळे