महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा महानवमी होम मंगळवारी संपन्न झाला. ( Navratri Ekvira Devi Mahanavami Hom Karla Fort Lonavala )
पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास हवन करण्यात आले. मध्यरात्रीनंतर देवीची नववी माळ लावून घट उठविण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंत्रोच्चारण करत होम प्रज्वलित करण्यात आला. होमात पुर्णाहुती दिल्यानंतर भाविकांची दर्शनरांग सुरू करण्यात आली. देवीचे आणि होमाचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविक गडावर येऊन थांबले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महानवमी आणि दशमी या वर्षी वेगवेगळ्या दिवशी आल्याने दिवसभर गडावर होमाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी राहणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा निर्बंधमुक्त उत्सव असल्याने नवरात्रीचे नऊ दिवस गडावर गर्दी होती.
अधिक वाचा –
कार्ला येथे श्री एकविरा देवीच्या दर्शनाने ‘बये दार उघड’ मोहिमेची सांगता I Karla
PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022