विजयादशमी निमित्त मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आले. तळेगाव शहरात शेकडो स्वयंसेवकांच्या उपस्थितीत पथसंचलन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ध्वजदंड आणि घोष पथकासोबत हे संचलन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी दसरा म्हणजेच विजयादशमी हा अतिशय महत्वाचा दिवस असतो. तळेगाव शहरातील अनेक स्वयंसेवक बुधवारी (5 ऑक्टोबर) रोजी विजयादशमी निमित्त एकत्र आले होते.
परंपरेनुसार सर्वांनी एका वेशभूषेत संचलन केले, तसेच विविध प्रत्यक्षिके सादर करत हा उत्सव साजरा केला. पणव, आणक यांचा ठेका धरत हे पथसंचलन पार पडले. ( Vjayadashami 2022 Celebrations Presence Of Hundreds Of Volunteers Of RSS At Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा महानवमी होम संपन्न
रेशन कार्ड धारकांनो; स्वस्त धान्य नक्की घ्या, पावत्याही आठवणीने घ्या, कुणाला किती धान्य मिळते? असे करा चेक