पाटण (ता. मावळ) : मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून सुमारे 7 कोटी 60 लक्ष निधीतून प्रजिमा 26 ते औंढे -देवले- मळवली-पाटण- पाथरगाव असा रा.म. 4 ला मिळणाऱ्या प्रजिमा 107 या रस्त्याची सुमारे 12 किलोमीटर सुधारणा करणे कामाचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या हस्ते मंगळवार (दिनांक 13 जून) संपन्न झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नैसर्गिक धबधबे व निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी या भागात पर्यटकांची पसंती वाढत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्याचे काम होणार आहे. यामध्ये औंढे ते देवले दरम्यान आठशे मीटर व पाटण गावांतर्गत तीनशे मीटर रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असून पाटण ते बोरज अशी मिसिंग लेन जोडण्याकरिता अडीच किलोमीटर लांबीमध्ये लहान पुल व मोऱ्यांसह डांबरी रस्ता नव्याने करण्यात येणार आहे. अशी माहिती सा. बां. विभाग शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी दिली. या रस्त्यामुळे या भागातील पर्यटन वाढीला चालना मिळून नागरिकांचे दळणवळण देखील सुलभ होण्यास मदत होईल. ( 7 Crore 60 Lakhs Fund From MLA Sunil Shelke For Patan to Boraj Road Maval Taluka )
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, संतोष राऊत,सरपंच प्रवीण तिकोणे, बाळासो येवले, भरत येवले, दत्ता भानुसघरे, विलास खांडेभरड, सुनिता काळुराम तिकोणे, माजी उपसरपंच बंटी शिळवणे, ग्रा. सदस्य मालता केदारी, संदीप तिकोणे, विशाल तिकोणे, अक्षय तिकोणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘इंद्रपुरी’तील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण । MLA Sunil Shelke
– कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी; वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे निर्णय