मावळ तालुक्यातील स्थानिक तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नांगरगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आमदार सुनिल शेळके यांनी भेट दिली. यावेळी आमदार शेळके यांनी विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधून अडचणी आणि सुचना जाणून घेतल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील हे एकमेव आयटीआय केंद्र असून येथील भौतिक सोयी सुविधा आणि दुरुस्तीसाठी सुमारे 4 कोटी निधीतून कामे करण्यात आली आहेत. त्याची आमदार शेळकेंनी पाहणी केली. पहिल्यांदाच आयटीआय मधील दुरुस्तीची कामे झाल्याने शिक्षकांनी देखील समाधान व्यक्त केले.
लोणावळा शहरात मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या मंडलाधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालयाच्या जागेची देखील आमदार शेळकेंनी पाहणी केली. लवकरच या कामास देखील सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच, लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची देखील आमदार महोदयांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून या रुग्णालयासाठी सुमारे 40 कोटी 94 लक्ष निधी उपलब्ध झाला आहे. लोणावळा आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा लवकर उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून कामास गती देण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या. ( mla sunil shelke visited lonavala nangargaon industrial training institute )
अधिक वाचा –
– तब्बल 1 कोटी 72 लाख रुपयांच्या साळुंब्रे नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न
– विद्युत विभागाच्या विविध कामांसाठी वडगाव नगरपंचायतला 2 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर