राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ( Garm Panchayat Election 2022 ) प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या ( Draft Voter Lists ) 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) जाहीर केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विधानसभा मतदारसंघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात.
७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार#ग्रामपंचायत#सार्वत्रिकनिवडणूक#निवडणूक#राज्यनिवडणूकआयोग#SEC_Maharashtra#Local_body_Elections pic.twitter.com/w133PtQPAJ
— Maharashtra SEC (@MaharashtraSEC) October 6, 2022
हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. ( Ward Wise Draft Voter Lists For Expiring And Newly Established Gram Panchayat In October and December Month Will Be Released On October 13 )
अधिक वाचा –
आख्ख्या महाराष्ट्राला ठाकरे-शिंदेंची चिंता, पण इकडे तर ठाकरे-शिंदे घरी लगीनघाई सुरु, विश्वास नसेल तर लग्नपत्रिका पाहा
शिवसेना भवनातून नवा आदेश..! शिवसेना मावळ तालुका प्रमुख पदी ‘यांची’ नियुक्ती, तर उपजिल्हाप्रमुख पदीही नवा चेहरा