मावळ तालुक्यातील येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंचपदी प्रियंका सुखदेव घारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते सरपंच जयवंत घारे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. यावेळी प्रियंका घारे या बिनविरोध सरपंच बनल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मंडलाधिकारी मारूती चोरमाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी प्रियंका घारे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चोरमले यांनी प्रियंका घारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रियेत गावकामगार तलाठी जाधव, ग्रामसेवक भरत शिरसाट यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून काम पाहिले. ( priyanka ghare elected unopposed sarpanch of yelghol dhangavan group gram panchayat maval taluka )
उपसरपंच सिताबाई रमेश भिलारे, ग्रामपंचायत सदस्य जयवंत सुदाम घारे, गोरक्षनाथ गणपत घारे, संतोष घारे, सिमा शेडगे, मंदाबाई उत्तम घारे हे यावेळी उपस्थित होते. तर, महादेव महाराज घारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पाडली.
प्रियंका घारे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला, तसेच भंडारा-गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला. घारे यांनी ग्रामदैवताच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथे त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
माजी सरपंच सुदाम घारे, माजी सरपंच विकास घारे, माजी सरपंच शाहिदास भिलारे, माजी उपसरपंच आनंद घारे, रा. कॉ. काले. गण. अध्यक्ष रोहिदास घारे, ज्ञानेश्वर घारे, तंटामुक्ती अध्यक्ष अनंता घारे, माजीसरपंच संतोष ओझरकर, राजेंद्र घारे, नामदेव घारे, दिनकर घारे, नितीन घारे, रा.काँ. अध्यक्ष सुधिर घारे, श्री. प्रकाश भिलारे, पवन मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लाला गोणते, अंकुश कारके, गोरख खराडे, रंगनाथ घारे, भाऊ भिलारे, रामदास कदम आदी यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवना धरणातून 15 दिवसात 22 हजार क्युबिक मीटर गाळ काढला, पाणीसाठ्यात मोठी वाढ
– राजमाची येथील वरे कुटुंबीयांचे आमदार सुनिल शेळकेंकडून सांत्वन, शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन