शिवशंभो प्रतिष्ठाण जवण यांच्यावतीने गावातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवन मावळ भागातील जवण क्रमांक 3 येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानकडून खाऊचे वाटप केले गेले. गावातीलच तरुणांच्या शिवशंभो प्रतिष्ठाणकडून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी शिक्षक पाठारे सर, अंगणवाडीच्या शिक्षिका मंगल तुपे, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मुकूंदा शिर्के, तेजस भिकोले, रमेश गोणते, मोहन भिकोले, दिलीप केदारी, साहिल गोणते, लक्ष्मण तुपे आदीजण उपस्थित होते. ( free educational materials to zilla parishad school students of jovan village pavan maval )
दिनांक 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. यावेळी नवीन विद्यार्थ्यांकडे शालेय साहित्यांची कमतरता असू नये, तसे त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी प्रतिष्ठानकडून हा उपक्रम राबवला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकुंदा शिर्के यांनी दैनिक मावळला दिली.
अधिक वाचा –
– ज्ञानज्योती फाऊंडेशनमार्फत पवळेवाडी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य
– श्री दत्तगुरुंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकांचे आणि रथयात्रेचे मावळ तालुक्यात जल्लोषात स्वागत
– सोमाटणेत पाऊण लाखांचे अं’मली पदार्थ जप्त, आरोपीला अटक । Maval Crime News