मोदी सरकारला केंद्रामध्ये सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदी@9 हे अभियान 30 मे पासून मावळ विधानसभा मतदारसंघात राबवण्याचे कार्य सुरू आहे. या अंतर्गतच घर घर संपर्क या अभियानाच्या माध्यमातून मागील 9 वर्षात मोदी सरकारने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण च्या माध्यमातून अंत्योदय हे ब्रीद घेऊन राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती घरोघरी पोहचविण्याचे कार्य या अभियानांतर्गत केले जाणार असून त्याची सुरवात आज वडगाव शहरात करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
घर घर मोदी अभियानाच्या माध्यमातून मावळ विधानसभा मतदार संघात 60 हजार नागरिकांना भेटून त्यांना मोदी सरकारच्या 9 वर्षातील लोककल्याणकारी निर्णयाची माहिती पत्रक वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आण्णासाहेब भेगडे यांनी यावेळी बोलताना दिली. ( Ghar Ghar Modi Campaign Started In Vadgaon Maval By BJP )
यासाठी घर घर मोदी अभियानाच्या मावळ विधानसभा संयोजक पदी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांची नियुक्ती केली असून पुढील 10 दिवसामध्ये मावळ विधानसभा मतदार संघातील सर्व मंडलातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक बूथ वरील किमान 200 नागरिकांना प्रत्यक्ष भेटून ही माहिती पत्रक वाटप करून मोदी सरकारने केलेल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून मावळ विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी करणार आहे.
यावेळी भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाशजी बवरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, माजी नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण भिलारे, रविंद्र म्हाळसकर, महेंद्र म्हाळसकर, उद्योजक गणेश भेगडे, माजी सरपंच संभाजीराव म्हाळसकर, कुलदीप ढोरे, अमोल धीडे, माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन कुडे, वडगाव शहर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे आदी प्रमुख उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासदाराची मागणी, केंद्रीय मंत्र्यांना दिले निवेदन
– ‘किल्ले लोहगडावरील अतिक्रमण हटवा, अन्यथा…’, लोहगड मुक्तीसाठी एकवटले हिंदू बांधव । Lohagad Fort News