मावळ तालुक्यात यंदाही जागतिक योग दिनाचा (21 जून) ( International Yoga Day 2023 ) सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम, शिबिरे आयोजित करण्यात आली होती. गावखेड्यांपासून ते शहरापर्यंत, शाळा-महाविद्यालयांपासून ते कामाची ठिकाणे, व्यवसाय-ऑफिसेस आदी ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने सिद्धांत फार्मसी सुदुंबरे इथे सहजयोग फाउंडेशन यांच्या वतीने योग आणि ध्यान या विषयावर चर्चासत्र आणि प्रात्यक्षिके आयोजन करण्यात आले होते. सहज योग फाउंडेशनचे प्रतिनिधी गणेश माळी यांनी उपस्थित विद्यार्थी, अध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योग आणि ध्यान यांचे महत्त्व सांगताना ध्यानाच्या माध्यमातून निरोगी आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासंबंधीचे मार्ग स्पष्ट केले. ( 21 June International Yoga Day celebrated in Maval Taluka Pune )
त्यांच्यासोबत फाउंडेशनचे इतर सहकारी देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला तिन्ही फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य अनुक्रमे राहुल डुंबरे, बसवराज मठदेवरू आणि सागर कोरे उपस्थित होते. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राजेश जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. तर, संस्थेचे कार्यवाह सौ शनन आणि मिहिर यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जागतिक योग दिन – 21 जून ( International Yoga Day )
भारतासह जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये या दिवसाबद्दलचा प्रस्ताव ठेवला आणि हा प्रस्ताव स्विकारला गेला, त्यामुळे 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून म्हणजेच 2015 पासून दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.
अधिक वाचा –
– पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम मार्गी लागणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता
– अंगावर काटा आणणारी बातमी..! आढले गावातील एकाच घरात सापडली घोणस सापाची तब्बल 20 पिल्ले