राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी (2 जुलै) रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांना ज्यांनी ज्यांनी पाठींबा दिला त्या आमदारांमध्ये मावळचे विधानसभेचे आमदार सुनिल शेळके हे देखील होते. सुनिल शेळके यांनी त्या दिवशीचा सर्व घटनाक्रम माध्यमांना सांगितला आहे. ( Maval Vidhan Sabha MLA Sunil Shelke Supports NCP Ajit Pawar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाले सुनिल शेळके?
1. अजितदादांच्या कार्यालयातून फोन आले होते की, आपल्याला सर्व आमदारांना एकत्र भेटायचंय.
2. भेटीच्या निमित्ताने काही चर्चा पण करायच्या होत्या. त्यामुळे आम्ही सर्वजण रविवारी दादांना देवगिरीवर सकाळी दहा वाजल्यापासून भेटत होतो.
3. त्यावेळी सर्वजण आपआपल्या मतदारसंघातील अडचणी सांगत होते, कामांबद्दल सांगत होते, कामं होत नाहीत याही भावना व्यक्त करत होते.
4. परंतू त्यावेळी आमच्याकडून दादांच्या बंगल्यावर सह्या देखील घेतल्या जात होत्या.
5. त्यामध्ये आम्हाला दादांनी विश्वासात घेऊन स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला सरकारमध्ये सामील व्हावं लागणार आहे. आपल्याला सत्तेत जायचं.
6. आपल्याला आपल्या भागातील कामे पूर्ण करायची असतील तर आपण सत्ते जावं हा पर्याय आपल्याला योग्य वाटतो, आणि सर्वांनी त्याला संमती दिली.
7. प्रत्येकाने स्टँप पेपरवर लिहून दिलं होतं. तसेच पक्ष प्रतोदांकडून आम्हाला फॉर्म आला होता, त्यावर आम्ही सर्वांनी सह्या देखील योग्य पद्धतीने पाहून केल्या आहेत.
8. दादांसोबत राहून किंवा आदरणीय पवार साहेबांसोबत राहून राष्ट्रवादीचा पक्ष हा सत्तेत राहणार, याच भुमिकेतून आम्ही हा निर्णय घेतलाय.
राष्ट्रवादीत दोन गट पडलेत, सुनिल शेळके कोणत्या गटात?
1. मी आपल्या माध्यमांतून सर्वांना सांगतो की दोन गट, तीन गट अशा बातम्या ज्या काही बातम्या आपल्याला पाहायला मिळतायेत, आपण पाहतोय त्यात काहीही तथ्य नाही.
2. आम्हा सर्वांचं दैवत पवार साहेब आहेत, आम्हा सर्वांचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब आहेत.
3. त्यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रातील सर्व विधीमंडळातील आमदार आम्ही सर्व काम करतोय.
4. दादा असतील, भुजबळ साहेब असतील, सुप्रिया ताई असतील या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारासोबत आम्ही सर्वजण एकत्रित आहोत.
5. आमचं एकच म्हणणं आहे, ज्या प्रमाणे सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला नागालँडमध्ये जे काही सहा-सात आमदार निवडूण दिले होते, त्यांना सत्तेत स्थान दिले. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही राष्ट्रवादीच्या आमदारांना स्थान मिळावं.
आमदारांवर जी काही कारवाई केली जात आहे, त्याबद्दल?
1. कारवाई वगैरे करण्याची जी काही प्रक्रिया फॉर्मॅलिटी आहे, ती करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायेत.
2. पण राज्यातील सर्वांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादीत कोणताही गट नाही, पवार साहेब असतील दादा हा कुठलाही वेगळा गट नाही, सर्व एकत्रतच आहेत.
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महत्वाची बातमी! राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत आणि किती आमदार शरद पवारांसोबत? पाहा संपूर्ण यादी