वडगाव शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून पाण्यावाचून नागरिकांचे अतोनात हाल सुरू आहेत. असे असताना सुद्धा नगरपंचायत प्रशासन मात्र त्यांच्याकडे सपशेल काना डोळा करून बिल्डर व धनिकांच्या बाजूने काम करू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. मागील काही महिन्यांपासून शहरात पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत असताना यावर तोडगा काढण्याऐवजी वडगावकरांच्या हक्काचे व तोंडच असणारं पाणी पळून बिल्डरांच्या घशात ओतण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत, असा घणाघात वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी यावर आवाज उठवला असून वडगाव नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या गृह प्रकल्पांना बेकायदेशीररित्या दिलेल्या पाणी लाईनची त्यांनी स्वतः जाऊन सोमवारी (दिनांक 3 जुलै) स्थळ पाहाणी केली असता आयुष पार्क-कातवी, नाईनवरे-वडगाव या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे पाणीपुरवठा सभापतींची कोणतीही परवानगी व ठराव न घेता तसेच पाण्याचे कुठले ही नियोजन न करता परस्पर पाईप लाईन जोडणी केलेली आढळून आली. ही अनधिकृत नळ जोडणी कोणी व कोणाच्या सांगण्यावरून केली यांची सखोल चौकशी करण्यात येणार असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती म्हाळसकर यांनी दिली. ( Water Theft In Vadgaon Maval City Saili Mhalskar Revealed )
मागील काही वर्षांपासून असे पाणी चोरीचे प्रकार काही मंडळींच्या कृपा आशीर्वादाने व पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या संगनमताने सर्रासपणे शहरात चालू असून हे प्रकार पाणी पुरवठा सभापती सायली म्हाळसकर यांनी अनेकदा रंगे हात पकडुन प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिले होते. तसेच अनधिकृत नळ कनेक्शनवरती रोख लावण्यासाठी वॉटर ऑडिट करण्याचा प्रस्ताव ही त्यांच्या वतीने देण्यात आला होता. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.
एरवी सर्वसामान्य नागरिकांना नियमांच्या फाईलीत अडकून ठेवून अर्धा इंची नळ कनेक्शनसाठी हेलपाटे मारायला लावणाऱ्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना बिल्डर व धनिकांना बेकादेशीर पाणी देताना याच नियमांची आठवण का झाली नाही हीच विशेष बाब आहे ? तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून वेळेत टॅक्स वसूल करणाऱ्या नगरपंचायत प्रशासन आता या पाणी चोरांकडून अवैधरीत्या वापरलेल्या पाण्याचा कोणता व कसा टॅक्स वसूल करणार, हा ही तितकाच महत्त्वाचा प्रश्न पुढे येत आहे.
हा सर्व मनमानी व भोंगळ कारभार पाहता नगरपंचायत प्रशासनाचा या बेकायदेशीर कामांवरती कोणताही धाक किंवा अंकुश उरलेला नाही का ? असा प्रश्न आता वडगावकर नागरिक विचारू लागले आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिस हद्दीतील कार्ला ते लोहगड मार्गाची IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून पाहणी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या