राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन बैठका आज (दिनांक 5 जुलै) मुंबईत झाल्या. यातील एक बैठक ही अजित पवार यांच्या नेतृत्वात झाली तर दुसरी ही शरद पवार यांच्या नेतृत्वाच यशवंतराव चव्हाण सेंटर इथे झाली. अजित पवार आणि अन्य सोबत गेलेल्या सर्व नेत्यांनी केलेल्या विधाने आणि आरोपांचा शरद पवारांसोबतच्या नेत्यांनी समाचार घेतलाच. परंतू स्वतः शरद पवार यांनीही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी बोलताना अनेक मुद्द्यांवर सखोल भाष्य केले. ( NCP Sharad Pawar full speech Yashwantrao Chavan Center Mumbai 5 July 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शरद पवार नेमके काय म्हणाले? पाहा संपूर्ण भाषण…
- ५ जुलै ही आजची एक ऐतिहासिक बैठक आहे.
- संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे आहे.
२४ वर्षांपूर्वी याच मुंबईत राष्ट्रवादीचा जन्म झाला. - राष्ट्रवादीची राज्यातील कानाकोपऱ्यात फळी उभी राहिली.
- राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले.
- सर्वसामान्य कार्यकर्ता नेता बनला आणि राज्य चालवू शकतो, हे दिसले.
- आज आपल्याला आणखीन पुढे जायचंय.
- संकटे खुप आहे. देशाची सुत्र अशांच्या हातात ज्यांच्याकडून देशाचं भलं होणार नाही.
- देशातील आज चित्र बदललंय. संवाद संपलाय. लोकशाहीत विरोधक असो किंवा अन्य संवाद पाहिजे.
- मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा सामान्य माणसांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद ठेवायचो.
- आज देशात हा संवाद नाही. आम्ही सर्व सत्ताधारी पक्षात नाही, पण लोकांमध्ये आहोत.
- त्यामुळे देशाच्या जनतेत एकप्रकारची अस्वस्थतात आहे.
- दुसरीकडे आम्ही एका बाजूला प्रयत्न सुरु केलेत, जिथे देशातील लोकशाही टिकवायची असेल संवाद सुरु ठेवायचा असेल, तर त्यासाठी पहिला प्रयत्न म्हणून विरोधी पक्षांची मोट बांधायला सुरुवात केलीये.
- आणी आम्ही हे सुरु केल्यावर ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यामध्ये अस्वस्थत पसरू लागली.
- पंतप्रधांनानी आठवड्यापूर्वी भोपाळमध्ये बोलताना सांगितले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला.
राज्यकर्त्यांनी आधाराशिवाय भाष्य करु नये. - पंतप्रधानांनी एकदा बारामतीत आल्यावर बोलले होते की देश कसा चालवायचा हे मी पंतप्रधानांकडून शिकलो.
- त्यानंतर प्रचाराला आले तेव्हा शिविगाळ केली. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांनी बोलताना काळजी घ्या.
- बेछूट आरोप करुन चालत नाही. जर चुक असेल कारवाई करावी. पण ठिके त्यांनी ती धमक दाखवली नाही.
- ते देशाचे नेते आहेत. त्यांनी देशाचे नेते म्हणून मर्यादा पाळणे आवश्यक आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका भ्रष्ट वाटत असेल तर कालच्या शपथविधीत त्यांना का घेतले?
- याचा अर्थ हे पाहिजे ते बोलतात. आधार नसेल ते बोलतात. आणि जनमाणसात गैरसमज पसरवतात.
- सत्ताधारी पक्षातील आमदार खासदार आम्हाला खासगीत अनेक गोष्टी बोलतात. इंदिराजी, राजीवजी, नरसिंहराव यांच्या अनेकांच्या कार्यकाळात बघितले. तेव्हा खासदारांची बैठका होत असे. पण आज संवाद संपला.
- हा देश आपल्या मुठीत चालवू शकतो, असा प्रकाड घडत आहे.
- महाराष्ट्रात काही लोकांनी बाजूला जायची भुमिका घेतली, माझी तक्रार नाही. दुःख आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, पक्षाने कष्ट घेतले. त्यांना विश्वासात घेतले नाही. आणि ज्यांच्या सोबत नको तिथे जाऊन बसले.
- तुम्ही सांगता राष्ट्रवादी म्हणजे आम्हीच.. उद्या कुणीही असे सांगेल.. अशा प्रकारचे बोलणे आणि सभा घेणे हे योग्य नाही, हे लोकशाहीत अपेक्षित नाही.
- आम्ही जेव्हा नवीन पक्ष काढायचं ठरवलं तेव्हा टिळक भवन सोडून टाकले.
- आजकाल पोलिसांची मदत घेऊन सांगता… घड्याळाची खुण कुणाची हे संपूर्ण देशाला माहिती आहे. निवडणूक आयोगाने कुणाला दिली माहिती आहे.
- पण मी सांगतो कोण कुठे जात नाही.
- आम्ही आजवर घड्याळ, पंजा, गाय वासरू अशा अनेकांवर लढलो.. पण जर कुणी सांगत असेल आम्ही चिन्ह घेऊन जाऊ.. तर चिन्ह कुठे जात नाही. पण जोवर सामान्य माणसांच्या मनात पक्षाची प्रतिमा सखोल आहे, तोवर चिंता करण्याचं कारण नाही.
- अनेकजण आज बोलले, म्हटले ‘ते आमचे गुरु आहेत’. तिथे सर्वात मोठा फोटो होता माझा. त्यांना माहितीये आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. त्यांचं नाणं चालणारं नाही, जे खणखणीत आहे, तेच घेतलं पाहिजे, हे त्यांना माहितीये.
- पांडुरंग बडव्यांनी घेरलाय… पांडुरंगाच्या दर्शनाला भेटायला जायची काही अडचण नाही… पंढरपूरात जाऊन अनेकांना पांडुरंग भेटत नाही.. कळसाचं दर्शन घेतात.. पांडूरंग म्हणायचं, गुरु म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं.
- भुजबळ — जेलमध्ये गेले होते. मला अनेकांनी सांगितलं होतं, संधी देऊ नका. पण संधी दिली. तिकीट दिली, निवडून आले आणि नंतर मंत्रीपदाची संधी दिली.
- भुजबळ — म्हटले बघून येतो म्हटले आणि शपथ घेऊन आले.
- राज्यकर्ते असे असावेत ज्यांनी राज्य एकत्रित ठेवावं. राज्यात आज एक उपमुख्यमंत्री आहेत, भाजपाचे आहेत.
- ज्यांनी विदर्भ वेगळं करण्यासाठी आरोळ्या ठोकल्या. आज विदर्भकडे दुर्लक्ष केलंय.
- आज आपले काही सहकारी गेले, अस्वस्थ आहोत.
- दहा दिवसांपूर्वी सांगितलं कि असल्या मुख्यमंत्र्यासोबत काम करावं लागतंय. आणि त्यांच्यासोबत गेलेत.
- पुलोदचा प्रयोग केला. तेव्हा सर्वांनी मला नेतृत्व करायला सांगितलं. तेव्हा जनता पक्ष होतं. तेव्हा असं सरकार देशात अनेक ठिकाणी असे सरकार आले होते. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात सर्वत्र असे पक्ष सरकार होते.
- नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत. तो भाग हा विरोधी देशांच्या सीमा असणाऱ्या आहेत.
- तिथे त्या परिस्थितीचा विचार करुन निर्णय घ्यावा लागतो.
- तिथे बाहेरून पाठिंबा दिलाय. इथे ते उदाहरण योग्य नाही.
- भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही गेलो हे सांगतात, .. पण जे जे भाजपाबरोबर गेले तिथे इतिहास आहे. तिथे सरकार चाललं नाही.
- तिथे पक्षांची एकजूट उद्धवस्थ करण्याची कामे झाले. तेलंगणा, बिहार, आंध्र, हरियाणा, पंजाब इथेही तेच झालं.
- चर्चा करुन गेले असते तर चांगलं झालं असंत. पण लक्षात घ्या बाहेर जे झालं तेच इथे होणार.
- तुम्ही भाजपासोबत गेलात, तसेच शिवसेनासोबत गेलेत. आणिबाणी नंतर शिवसेनेने एकही उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा दिला होता.
- तेव्हाही काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
- शिवसेनेचं हिंदुत्व हे अठरापगड जातीला सोबत घेऊन जाणारं आहे. भाजपाचं हिंदुत्व विखारी आणि माणसां माणसांत नातं बिघडवणारं आहे.
- आपल्या राज्यात काही दिवसांपूर्वी दंगली झाल्या. यात कोण होतं हे देशाला माहितीतीये. जिथे आपली सत्ता नाही तिथे तिथे समाजात विद्वेष वाढवायचा हे भुमिका भाजपाची तिथे आहे.
- जे राष्ट्रप्रेमी नाहीत त्यांच्या सोबत आम्ही जाणारच नाही.
- देशात आज महागाई, बेकारी, महिलांवरील हल्ला असे अनेक प्रश्न आहेत.
- ज्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, त्यांच्याबद्दल काय बोलणार.
- या लोकांना सत्तेपासून दूर करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली करणे हाच अजेंडा आहे.
- आज किती आमदार कुणाकडे आणि काय याच्या खोलात जाणार नाही.
- जे गेले त्यांची चिंता करु नका. त्यांना सुखाने तिकडे राहुद्या. जोवर आपण एकत्र आहोत, यातून एक नवीन कर्तृत्वान पिढी घडवू.
- सुरेश भट यांच्या ओळी आठवतात…
“उषःकाल होता होता, काळरात्र झाली…. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली”
अधिक वाचा –
– “दादांनी आम्हाला विश्वासात घेऊन स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला सरकारमध्ये सामील व्हावं लागणार आहे” – सुनिल शेळके
– महत्वाची बातमी! राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत आणि किती आमदार शरद पवारांसोबत? पाहा संपूर्ण यादी