कर्जत (रायगड) : दिनांक 30 जून 2023 रोजी कर्जत आषाणे वाडी इथे राहणाऱ्या लक्ष्मी सखाराम लोटे (वय 36) या महिला आषाणे येथील धबधब्यात पडून वाहून गेल्या होत्या. या घटनेने संबंधित कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले होते, तर महिलेच्या पश्चात एकटीच असलेली मुलगी अनाथ झाली होती. याचे कारण काही वर्षांपूर्वीच तिचे वडिलांचे छत्रही हरवले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ही गोष्ट जेव्हा गरजूंना अहोरात्र मदतीचा हात देणाऱ्या माधवीताई जोशी यांना समजली, तेव्हा त्यांनी विनाविलंब बेबी नावाच्या सदर लहानग्या मुलीची भेट घेतली. तसेच “माधवीताई युवा प्रतिष्ठानतर्फे” रोख रकमेची मदत देखील केली. यासह तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील माधवी जोशी यांनी प्रतिष्ठानमार्फत घेतली आहे. त्यामुळे या 14 वर्षीय चिमुकलीला मायेचा आधार मिळाला आहे. ( madhavi joshi financial help to an orphan girl maval lok sabha raigad district )
‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ – माधवी जोशी
मावळच्या भावी खासदार अशी प्रतिमा जनमाणसात निर्माण झालेल्या माधवी जोशी या ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ या उक्तीप्रमाणे सध्या समाजकार्य करत असल्याचे दिसत आहे. भविष्यात या मुलीला लग्नाचेवेळी देखील मदत करण्याचे आश्वासन माधवी जोशींनी दिल्याने खऱ्या अर्थाने मुलीला एका आईचा आधार मिळाल्याचे परिसरात बोलले जात आहे.
डिकसळ येथील प्रतिक्षा रिसॉर्टमध्ये झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमावेळी उमरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच ठमी नामदेव सांबरी, समाजसेवक नामदेव सांबरी तसेच या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सागर शेळके यांनी सदर परिवाराला मदतीच्या भावनेने बोलावून त्यांची माहिती घेऊन त्यांच्या रिसॉर्टमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती. यावेळी पत्रकार रमाकांत जाधव, योगेश पोथरकर आणि माधवी जोशींच्या युवा फाऊंडेशनचे सहकारी उपस्थित होते.
माहिती – रमाकांत जाधव
शब्दांकन – विशाल कुंभार
अधिक वाचा –
– भारतीय हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी 6 जुलै रोजी रेड अलर्टची पूर्वसूचना, नागरिकांसाठी ‘या’ खास सुचना
– काळीज चिरणारी बातमी! चौथ्या मजल्यावरुन कोसळल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, वडगावातील दुर्दैवी घटना
– शेतकऱ्यांनो..! प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया