मावळ तालुक्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तळेगाव आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात शाळा व्यवस्थापनाकडून मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कॉलेजचे प्राचार्य अलेक्झांडर यांच्याच संमतीने हा प्रकार घडला असून सदर ख्रिश्चन प्राचार्य हा कॉलेजात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला आहे. तसेच ही बाब पुढे आल्यानंतर पालक वर्ग आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी सदर प्राचार्यांना चोप दिल्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यात एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच डी. वाय. पाटील महाविद्यालयातील या प्रकाराने सर्वत्र खळबळ माजली आहे. मुलींच्या प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसल्याचे पालकांनी सांगितले. तशी तक्रार पोलिसांकडे देखील करण्यात आली. बजरंग दल सारख्या हिंदू संघटनांनी या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला, तेव्हा महाविद्यालयात फक्त ख्रिश्चन प्रार्थना घेतली जाते असा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण केली. तसेच प्राचार्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, अशी मागणी देखील बजरंग दलाने केली आहे. ( Maval Talegaon News D Y Patil Collage Principal Assaulted By Bajrang Dal Activists For Installing CCTV Camera In Girls Toilet )
बजरंग दलाने प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाण केली असता एकच गोंधळ उडाला. तसेच पोलिसांनी देखील गांभीर्य ओळखत ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. मावळ तहसीलदारांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने मात्र आता याबद्दल बोलण्यास नकार दिला असून यासंदर्भात मौन बाळगले आहे. त्यामुळे महिला-मुलींच्या प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते की नाही, हे स्पष्ट झालेेले नाही.
अधिक वाचा –
– ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ : मावळच्या भावी खासदार… माधवी जोशी यांच्याकडून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन
– मोठी बातमी! कान्हे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू