मावळ, मुळशी, खेड आणि हवेली तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात 2021- 22 मध्ये विक्रमी ऊस उत्पादन घेतल्याबद्दल कुंडमळा (इंदोरी) येथील शेतकरी संजय पंढरीनाथ भेगडे यांचा संत तुकाराम सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांचे हस्ते संजय भेगडे यांचा सत्कार करण्यात आला. ( Farmer Sanjay Bhegde Felicitated By Sant Tukaram Cooperative Sugar Factory )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संजय भेगडे यांनी 4 एकर क्षेत्रात 272 टन ऊसाचे उत्पादन घेतले. कारखाना कार्यक्षेत्रात सरासरी 40 ते 50 टन एकरी उत्पादन मिळते. मात्र, भेगडे यांनी सरासरी 68 टन उत्पादन घेतले आहे. ऊस बेणे 86032 या वाणाची टक्कर पध्दतीची लागवड केली आहे. साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विशाल दरेकर यांचे मशागत, लागवड, खते, किटकनाशके, फवारणी व पाण्याची आळवणी याबाबत मार्गदर्शन मिळाले, असे संजय भेगडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हेही वाचा – श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना वार्षिक सभा : ‘मावळ, मुळशीतील अनेक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन कमी’
यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, दिगंबर भेगडे, आमदार सुनील शेळके, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, भाऊसाहेब भोईर, संचालक माऊली दाभाडे, शिवाजी पवार, अनिल लोखंडे, बाळासाहेब विनोदे तसेच जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. ( Farmer Sanjay Bhegde Felicitated By Sant Tukaram Cooperative Sugar Factory )
अधिक वाचा –
पोल्ट्री व्यवसायावर ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणारा कर माफ करण्यात यावा; संघटनेची आग्रही मागणी
देहुरोडमध्ये ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मारण्याचा कट’ ? एका फोनने खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण