सत्तेत सामील झालेल्या आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार आणि त्यांच्या अन्य मंत्री गटाच्या वाट्याला कोणती खाती येणार, याची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. यातच आता समोर आलेल्या एका जीआरनुसार अजित पवार यांना त्यांच्या पसंतीनुसार वित्त खाते मिळणार असल्याचे समजत आहे.
राज्य सरकारने एक जीआर जारी केला आहे. 7 जुलै 2023 रोजीचा हा जीआर दिसत आहे. विदर्भ, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ सुधारित उपसमिती स्थापन करण्यासाठीचा हा जीआर आहे. ( Will Ajit Pawar get post of finance minister in Maharashtra government )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या जीआरद्वारे ही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करणअयात आली आहे. एकूण पाच सदस्यांची ही समिती आहे. या समितीत सुधीर मुनगंटीवार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुनगंटीवार यांच्या नावापुढे कंसात वनमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. उदय सामंत यांच्या नावापुढे उद्योग मंत्री आणि अतुल सावे यांच्या नावापुडे सहकार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे ऊर्जा मंत्री उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे अर्थमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला नाही.
अजितदादांच वित्तमंत्रीपद पक्क?
कारण, राज्य सरकारने एक जीआर जारी केला आहे. 7 जुलै 2023चा हा जीआर आहे. विदर्भ, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ सुधारित उपसमिती स्थापन करण्यासाठीचा हा जीआर आहे.
या… pic.twitter.com/mRdiFAyb66
— पवन/Pawan ???????? (@ThePawanUpdates) July 9, 2023
महत्वाचे म्हणजे या जीआरमध्ये पाच सदस्यांच्या यादीत फडणवीस यांच्यानंतर एक पद रिक्त ठेवलं आहे. त्यात फक्त अर्थमंत्री असा उल्लेख केला आहे. अर्थमंत्र्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. अर्थखातं फडणवीस यांच्याकडे असतानाही फडणवीस यांचा उल्लेख त्या रिक्त नावात करण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्थमंत्रीपद अजित पवार यांनाच देण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून फक्त अधिकृत घोषणा होण्याची बाकी असल्याचं स्पष्ट होत आहे.
माहिती स्त्रोत – ट्विटर (@ThePawanUpdates)
अधिक वाचा –
– पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण
– किशोर आवारे हत्या प्रकरणात महत्वाचे अपडेट! फरार आरोपी भानू खळदे नाशिकमधून जेरबंद, असा अडकला जाळ्यात