मावळ तालुक्यातील कुंडमळा इथे पर्यटनासाठी आलेला ओमकार गायकवाड (वय 24) हा तरुण तीन दिवसांपूर्वी इंद्रायणीच्या पात्रात वाहून गेला होता. तीन दिवसापासून त्याचा शोध सुरु होता. मात्र, अखेर काल (रविवार, दिनांक 9 जुलै) रोजी आपदा मित्रांना आणि शोधकार्य करणाऱ्या पथकाला त्याचा मृतदेह सापडला. त्याचे कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह पाहताच एकच आक्रोश केला. यावेळी मृत ओमकारच्या आईचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तळेगाव दाभाडे शहराजवळ असणाऱ्या इंदोरी गावच्या हद्दीतील कुंडमळा येथील पाण्याच्या प्रवाहात शुक्रवारी (दिनांक 7 जुलै) रोजी ओमकार गायकवाड हा तरुण वाहून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन पथकाला 3 दिवस प्रयत्न करावे लागलेत. यादरम्यान ओमकारसोबत असलेला त्याचा मित्र आदित्य गायकवाड याने वाहून गेलेल्या ओंकारचा शोध लागत नसल्यामुळे त्याच ठिकाणी पाण्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, तेथील स्थानिकांनी प्रसंगावधान राखून त्याला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. ( young tourist body was found who was washed away in Indrayani river at kundmala )
शुक्रवारपासून तळेगाव दाभाडे पोलीस, लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संघटना आणि आपदा मित्र मावळ या आपत्कालीन पथकांचे सदस्य ओमकारचा शोध घेत होते. अखेर रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ओंकारचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग, वन्यजीव रक्षक मावळ व ‘आपदा मित्र’ या संघटनांना यश आले.
अधिक वाचा –
– ‘शिवदुर्ग मित्र’ला ‘स्टार ऑफ लोणावळा’ पुरस्कार
– मोठी बातमी! लोणावळा शहराजवळील खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू