व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचा सन्मान । Talegaon Dabhade

शिक्षकांनी नेहमी अद्यावत ज्ञान मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 10, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
SSC-HSC-students-maval

Photo Courtesy : Bharat Kale


शिक्षकांनी नेहमी अद्यावत ज्ञान मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मावळ तालुक्यातील मराठी माध्यमांच्या शाळांतील एस.एस.सी परिक्षेत गुणवंत विद्यार्थी व १०० टक्के निकाल लावलेल्या मुख्यध्यापकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमांच्या वेळी साळुंखे बोलत होते.

पुढे बोलताना साळुंखे म्हणाले की, “शिक्षकांनी नेहमी अद्यावत ज्ञान मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले पाहिजे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे पवित्र काम करा”, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. तसेच, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे उत्तम कामाबद्दल अभिनंदन केले. ( Maval Taluka SSC HSC Meritorious Students And Their Principals Honored At Talegaon Dabhade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मावळ आणि कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल, ट्रस्ट तळेगाव दाभाडे, तसेच रोटरी क्लब ऑफ व तळेगाव एम.आय.डी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे यांचे स्मरणार्थ रविवारी (दिनांक 9 जुलै) रोजी मावळ तालुक्यातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ मध्ये तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील प्रथम क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यी गुणगौरव समारंभ तसेच १०० टक्के निकाल लावलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील शाळांमधील ६५ विद्यार्थी व शाळा सहभागी झाले होते तसेच तालुक्यातील मराठी माध्यमांच्या १०० टक्के निकाल लावलेल्या १५ मुख्याध्यापकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमासाठी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश काशिद, जिल्हा कार्यवाह महेश शेलार, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, शिक्षक परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आगळमे, रोटरी क्लब ऑफ ३१३१ चे उपप्रांतपाल शंकरगौडा हदिमनी, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माळशिकारे सर, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सीचे अध्यक्ष राहूल खळदे, सचिव रो. सुनिल खोल्लम, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळचे अध्यक्ष लक्ष्मण मखर;

कार्यवाह देवराम पारिठे उपाध्यक्ष सोपान असवले, श्रीनिवास गजेंद्रगडकर, धनकुमारशिंदे,कोषाध्यक्ष राजेंद्रभांड, सहकार्यवाह रियाज तांबोळी, रो. ममता कोल्हटकर, उपप्रांतपाल रो. शंकर हदिमणी, रो. सुनील नाना भोंगाडे, रो. हिरामण बोत्रे, रो. सुदाम दाभाडे, रो. विन्सेंट सालेर, रो. अजय पाटील, सल्लागार विलास भेगडे, धनंजय नांगरे, नारायण असवले, संजय वंजारे, रविंद्र शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – कै. ॲड. शलाका खांडगे हिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पवना शिक्षण संकुलातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

या प्रसंगी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, या पुढील शिक्षण उत्तम पद्धतीने पूर्ण करून आपल्या आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करून देशाचा नावलौकिक वाढवावा. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी चे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण मखर यांनी केले सुत्रसंचालन भारत काळे आणि प्रभा काळे यांनी केले. तर आभार रोटरीचे अध्यक्ष राहुल खळदे यांनी मानले.

अधिक वाचा –
– पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण
– अजितदादांचे वित्तमंत्रीपद पक्के? समोर आलाय मोठा पुरावा, पाहा…
– मोठी बातमी! लोणावळा शहराजवळील खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

कुंडमळा इथे वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला, लेकाच्या मृतदेहाला बघताच आईने फोडला टाहो

Next Post

मोठी बातमी! ‘येत्या काही तासात होणार मंत्रिमंडळाचे खातेवाटप’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
eknath-shinde-and-devendra-fadanvis

मोठी बातमी! 'येत्या काही तासात होणार मंत्रिमंडळाचे खातेवाटप'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.