नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना शिक्षण संकुल पवनानगर येथे कै. ॲड. कुमारी शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे हिच्या स्मरणार्थ शनिवारी (दिनांक 8 जुलै) आर्थिक दुर्बल घटकातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘रोटरी हॅप्पी स्कूल बॅग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या कार्यक्रमासाठी काले पवनानगर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच उत्तम चव्हाण, माजी उपसरपंच प्रविण घरदाळे, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती विद्या गांधी मॅडम, काले केंद्राचे केंद्रप्रमुख पांडुरंग डेंगळे, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका केसकर मॅडम, शिक्षक प्रतिनिधी ठोंबरे सर, प्राथमिक विभागाचे प्रमुख साठे सर, शाळचे जेष्ठ अध्यापक राजकुमार वरघडे सर आदी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील इयत्ता 1 ली ते 12 वी विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले, तर आभार काळे सर यांनी मानले. ( school bags distributed to poor and needy students of pavana education complex pavananagar )
अधिक वाचा –
– मोरया ढोल ताशा पथकाकडून ध्वज आणि वाद्य पूजन; 150 सभासदांच्या उपस्थितीत ढोल-ताशा सरावाला सुरुवात
– आरपीआय आणि संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पवनानगरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा समारंभ