मोरया ढोल ताशा ध्वज पथक वाद्य पूजन शुभारंभ मावळ तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे आणि ढोल पथकातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत विशाल लाॅन्स येथे संपन्न झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावर्षी मावळसह संपूर्ण महाराष्ट्रात ढोल पथकांचा आवाज जोशात घुमणार असून मोरया ढोल पथकाला यशस्वी बारा वर्ष पूर्ण झाली आहेत. आजपासून मोरया ढोल पथकातील सुमारे 150 सभासदांच्या उपस्थितीत सरावास प्रारंभ करण्यात आला. परराज्यात जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने वादन करणारे मोरया ढोल पथक हे मावळ तालुक्यातील पहिले पथक आहे. ( moraya dhola tasha pathak practice started vadgaon maval )
सामाजिक बांधिलकीतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोरया ढोल पथकाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील, अशी इच्छा नगराध्यक्ष मयूर ढोरे, पथक प्रमुख गणेश जाधव यांनी व्यक्त केली.
अधिक वाचा –
– आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून मावळ तालुक्यातील 50 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर वाटप
– ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ : मावळच्या भावी खासदार… माधवी जोशी यांच्याकडून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन