आंध्रप्रदेश राज्यातील अलुरी सिताराम राजू जिल्ह्यातील पदेरू पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 25 जून 2023 रोजी पदेरू पोलिसांनी अवैध गांजाची तस्करी करणारी महिंद्रा XUV 500 ह्या गाडी मधून 400 किलो वजनाचा गांजा जप्त केला होता. सदर कारवाई दरम्यान पदेरु पोलिसांनी आरोपी मताम सीमाद्री रामचंद्र पाडल ( रा. गुंद्रमेता, मुंचिंगपुट मंडळ, जि. अलुरी सिताराम राजू, राज्य आंध्रपदेश) याला ताब्यात घेतले होत, तर दुसरा आरोपी फिरोज अजीज बागवान (रा बारामती, ता बारामती जि पुणे) हा पळुन गेला होता, त्यामुळे त्यावर एनडीपीएस कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर गुन्ह्यातील आरोपी फिरोज बागवान हा बारामती परीसरात असल्याची बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारामती परीसरात सापळा लावून नमुद गुन्ह्यातील मुख्य आरोपी फिरोज अजीज बागवान (रा बारामती ता बारामती जि पुणे) यास दिनांक 7 जुलै 2023 रोजी ताब्यात घेतले. सदरचा आरोपीला पदेरू पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ( chief smuggler jailed while smuggling 400 kg of ganja from Andhra Pradesh Action by Pune Local Crime Branch )
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोसई अभिजीत सावंत, सहा फौजदार हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, पोहवा अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, हेमंत विरोळे यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा पोलिस स्वयंसेवक दलाची स्थापना, तुम्हीही होऊ शकता स्वयंसेवक, अशी करा नोंदणी
– इंद्रायणीच्या डोहात सापडलेल्या नवविवाहितेच्या मृत्यूचे गुढ उकलले! नवराच निघाला आरोपी…