सध्या लोणावळा व मावळ परिसरात पाऊस चालू झाल्यामुळे लोणावळा व परिसरामध्ये शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वर्षाविहारासाठी लोणावळा शहर व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येतो. परंतू पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक नियमन करण्यासाठी अडचणी येत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी वर्षाविहार बंदोबस्तासाठी सजग नागरिकांची मदत घेण्याचे ठरवून लोणावळा पोलीस स्वयंसेवक दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. ( Establishment of Lonavala Police Swayamsevak Dal Name Registration Process and Link )
लोणावळा पोलीस स्वयंसेवक दलामध्ये NCC कॅडेड, NSS कॅडेड, महाविद्यालीन विध्यार्थी, ग्राम सुरक्षा दलाचे जवान, सेवाभावी संस्थाचे सदस्य, खाजगी सुरक्षा दलाचे जवान व स्वेच्छेने काम करू इच्छिणारे नागरिक यांना सहभाग दिला जाणार आहे. या दलात सहभागी होण्यासाठी गूगल फॉर्म मध्ये स्वयंसेवकांचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.
इथे करा नोंदणी https://forms.gle/NpMRAxgzfBJhXCHK6
“तरी आपल्या लोणावळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी व पर्यटकांना मदतीसाठी लोणावळा पोलीस स्वयंसेवक दला मध्ये सहभागी व्हावे” असे आवाहन लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, 13 तालुक्यात 241 दुकानांसाठी जाहीरनामा
– मावळ लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मीच निवडणूक लढवणार – खासदार श्रीरंग बारणे