नवविवाहितेचा मानसिक आणि शारिरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मृत पत्नीच्या पतीला अटक केली आहे.
नवऱ्याने सतत माहेराहून दुचाकी, सोने आणि पैसे आणण्याचा तगादा लावल्याने अखेर त्रासलेल्या नवविवाहितेने इंद्रायणी नदी पात्रात उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली होती. सोमवारी (दिनांक 3 जुलै) रोजी ही घटना घडली होती. प्रज्ञा कौशल भोसले (वय 24 रा. वराळे ता. मावळ जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मृत विवाहितेच्या आईने या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानुसार पोलिसांनी मृत विवाहितेचा पती कौशल पिराजी भोसले (वय 30 रा. तपोधाम कॉलनी, वराळे, ता. मावळ जि. पुणे) याला अटक केली आहे. ( Married woman commits suicide due to husband’s troubles accused arrested Talegaon MIDC Police )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रज्ञा हिचा कौशल भोसले याच्या सोबत याच वर्षी दिनांक 11 मे 2023 रोजी विवाह झाला होता. लग्नाच्या 5 ते 6 दिवसानंतरच कौशलने प्रज्ञाकडे दुचाकी, सोन्याची चैन व पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. तसेच हे सर्व माहेराहून आणत नसल्याने तिला जाणूनबुजून रात्रभर पाय दाबून दे वगैरे सांगत मानसिक, शारिरिक छळ करत होता, असे फिर्यादीत नमुद आहे.
मृत विवाहितेच्या घरी अपंग आई, लहान भाऊ असल्याने मुलीने पावणेदोन महिने त्रास सहन केला. मात्र अखेर सोमवारी नवविवाहिता प्रज्ञा हिने इंदोरी जवळील पुलावरुन इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार पांडे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ( Married woman commits suicide due to husband’s troubles accused arrested Talegaon MIDC Police )
अधिक वाचा –
– झोपण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अंथरुण दहावेळा चेक कराल..! हातावरुन काहीतरी गेले म्हणून बघितले आणि धक्काच बसला
–आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून मावळ तालुक्यातील 50 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर वाटप