रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मावळ तालुका अध्यक्ष तसेच संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव तसेच काले-पवनानगर चे माजी सरपंच लक्ष्मण शंकर भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पवनानगर केंद्रातील 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवनानगर केंद्रातील संकल्प इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी तसेच पवना विद्या मंदिर, वारू कोथूर्णे माध्यमिक विद्यालय, संत ज्ञानेश्वर विद्यालय दिवड, ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बऊर, संत तुकाराम विद्यालय शिवणे, छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली, एस.आर.टी. कामशेत, बालविकास विद्यालय तळेगाव, कांतीलाल शहा विद्यालय तळेगाव आदी शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Meritorious Students Ceremony in Pavananagar in association with RPI and Sankalp Shikshan Prasarak Mandal )
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन गुणवंत विद्यार्थी आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून झाली. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे होते.
सत्कारमूर्ती लक्ष्मण भालेराव यांच्या सह पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, पुणे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष समीर जाधव, खादी ग्रामोद्योग मावळ तालुका चेअरमन कांचन भालेराव, सरपंच खंडू कालेकर, अशोक सरवते , कमलशील म्हस्के, राजू देसाई,महिंद्र देसाई, संकल्प इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक राहुल सोनवणे इंद्रपालसिंग रित्तु ,संतोष कदम, किसन अहिरे, संदीप भुतडा, ज्ञानेश्वर ठाकर, ज्ञानेश्वर शिवणेकर, लहू कालेकर,शक्ति जव्हेरी, युवक अध्यक्ष अंकुश सोनवणे,अरविंद रोकडे, विकास शिंदे, नागेश ओव्हाळ, रूपेश गायकवाड, भाऊ सोनवणे,मा.उपसरपंच शिवणे गणेश गायकवाड, सुशांत कदम, प्रदीप वाघमारे, नीलेश यादव सिद्धार्थ चौरे, संदीप चौरे,गराडे सर, शेटे सर, भारत काळे नीता कालेकर सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर , प्रियांका येवले, वैष्णवी काळे, सुजाता वाघेरे, आशा बोरकर आदी मान्यवर मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शांताई ग्रुपचे प्रतीक भालेराव, प्रशांत भालेराव, श्रीकांत भालेराव आदींनी केले. सूत्रसंचालन संकल्प इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी तर आभार अरविंद रोकडे यांनी केले.
अधिक वाचा –
– आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून मावळ तालुक्यातील 50 शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर वाटप
– ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें’ : मावळच्या भावी खासदार… माधवी जोशी यांच्याकडून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन