वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून बोर्ग वॉर्नर कंपनी, तळेगाव एमआयडीसी येथील 40 कामगारांमध्ये सापांविषयी आणि इतर प्राण्यांविषयी जनजागृती करण्यात आली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती कार्यशाळा पार पडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वन्यजीव रक्षकचे सदस्य विकी दौंडकर, जिगर सोलंकी, आदेश मुथा यांनी कंपनीतील कामगारांना प्रत्यक्षात मार्गदर्शनक केले. मावळ तालुक्यात आढळणारे विविध साप, त्यांच्या प्रजाती, विषारी-बिनविषारी साप आदी प्रकारांबाबत माहिती देण्यात आली. तसेच सापाची जात ओळखणे, साप चावल्यानंतर करायचे प्रथमोपचार, साप आपल्या परिसरात येऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना, सापांपासून होणारे फायदे अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. यावेळा सापांबद्दल असलेले अनेक गैरसमज देखील दूर करण्यात आले. ( Awareness About Snakes By Wildlife Protector Maval At BorgWarner Emissions Talegaon Pvt Ltd )
सापांविषयी संपूर्ण माहिती कामगारांना देण्याचे काम जिगर सोलंकी यांनी केले. मावळात 36-37 प्रकारचे साप आढळून येतात. त्यात 4 साप (नाग, घोणस, मण्यार, फुरसे) हे मानवीवस्ती मध्ये जास्त करून आढळुन येतात आणि हे साप विषारी आहेत. त्यांच्यापासून मावळ तालुक्यात आधिक प्रमाणात सर्पदंश होतात. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सापांची पिल्ले आढळुन येतात. तरीही प्रत्येकाने याबाबत काम करत असताना काळजी घ्यावी, काम करताना बूट घालावेत, रात्रीची टॉर्च वापरावी, परिसर स्वच्छ ठेवावा, अशी महत्वाची माहिती देण्यात आली. तसेच सर्प दंश झाल्यावर गैरसमज टाळून त्वरित जवळपासच्या रुग्णालयात जावे, असा सल्लाही देण्यात आला.
“कोणताही वन्य प्राणी आम्ही मारणार नाही किंवा त्याला इजा करणार नाही आणि वन्यप्राणी आम्ही वाचवू” अशी शपथ यावेळी बोर्ग वॉर्नर कंपनीच्या कामगारांनी घेतली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी सांगितले की मावळ तालुक्यात सापांचे प्रमाण खूप जास्त आहे. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कुणालाही शाळा, कंपनी, गाव आदी भागात जनजागृती करायची असल्यास आमच्या संस्थेला संपर्क (98225 55004) करावा किंवा वन विभागला कळवावे.
अधिक वाचा –
– ‘माझं वडगाव माझं व्हिजन’ अभियानाद्वारे मनसेने जाणून घेतली तज्ञांची मते; शहराच्या विकासासाठी बनवणार ‘ब्लूप्रिंट’!
– राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या शिळींब सोसायटीच्या चेअरमनपदी ‘ढमाले’ तर व्हाईस चेअरमनपदी ‘जगताप’ बिनविरोध
– अपघात ब्रेकिंग! तळेगाव दाभाडे शहराजवळ काळोखे पेट्रोलपंप इथे भीषण अपघात, अनोळखी वाटसरूचा जागीच मृत्यू