व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खरीप हंगाम पीक स्पर्धा, जाणून घ्या स्पर्धेचे नियम आणि प्रक्रिया; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हा, कृषी विभागाचे आवाहन

पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 14, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र
Kharif-Season-Crop-Competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मूग व उडीद या 11 पिकांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेता यावे आणि त्यांच्यात स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी, राज्यात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तालुक्यामध्ये लागवड क्षेत्र 1 हजार हेक्टर हून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ( Kharif Season Crop Competition 2023 Know Rules And Procedures Pune Maharashtra )

स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरिता भाग घेण्यासाठी 300 रुपये प्रति शेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क राहील.

हेही वाचा – पवन मावळ भागात आधुनिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात, वारू गावातील शेतकऱ्यांची चारसूत्री पद्धतीला पसंती

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. यापूर्वी तालुका पातळीवर कधीही प्रथम तीन क्रमांक आलेले शेतकरी जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. त्याचप्रमाणे यापूर्वी जिल्हा पातळीवर प्रथम तीन आलेले शेतकरी राज्य पातळीवर सहभागी होण्यास पात्र असणार असून तालुका व जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धा स्वतंत्र होणार आहे.

खरीप हंगामातील मूग व उडीद पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै व भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– नगराध्यक्षांना आमदारांची साथ, वडगाव शहर टाकतंय कात! नगरपंचायत हद्दीतील विविध भागांत विकासकामांना धडाक्यात सुरूवात
– राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या शिळींब सोसायटीच्या चेअरमनपदी ‘ढमाले’ तर व्हाईस चेअरमनपदी ‘जगताप’ बिनविरोध


dainik maval jahirat

Previous Post

‘माझं वडगाव माझं व्हिजन’ अभियानाद्वारे मनसेने जाणून घेतली तज्ञांची मते; शहराच्या विकासासाठी बनवणार ‘ब्लूप्रिंट’!

Next Post

मावळात सापांची संख्या अधिक, सर्पदंश झाल्यास काय करावे? वन्यजीव रक्षक मावळकडून कामगारांमध्ये जनजागृती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Awareness-About-Snakes

मावळात सापांची संख्या अधिक, सर्पदंश झाल्यास काय करावे? वन्यजीव रक्षक मावळकडून कामगारांमध्ये जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.