आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत निधीतून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांने वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मोरया काॅलनी येथील आनंदी वास्तू बिल्डिंग ते शर्मा हाऊस परिसरात सुमारे १४ लक्ष ७० हजार रुपयांच्या रस्ता कॉंक्रिटीकरण करणे विकासकामाचा भूमिपूजन शुभारंभ प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, प्रगतशील शेतकरी विष्णू ढोरे, नंदकुमार ढोरे, सामाजिक कार्यकर्ते रामदास ढमढरे, उद्योजक संतोष म्हाळसकर, पप्पू जगताप, अशिष कोंडे, अनिकेत ढोरे आणि प्रभागातील स्थानिक रहिवासी, महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( various development works are in progress at vadgaon maval city )
खूप वर्षांपूर्वीचा रस्त्याचा विषय मार्गी लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचे विशेष आभार मानले. वडगाव शहरातील सर्वच परिसरातील विकासकामांना गती आली असून काही कामे पूर्णत्वास आली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
याव्यतिरिक्त शहरातील विविध ठिकाणी चाळीस ठिकाणी सौर उर्जेवर चालणारे हायमास्ट दिवे बसविण्यात येत आहे. तसेच नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ११,१२,१३,०२ व १७ येथील परिसरात काही दिवसांतच LED स्ट्रीट लाईटचे पोल उभारण्यात येणार आहेत अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली.
अधिक वाचा –
– वडगावमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजनेचे अर्ज भरणे आणि E-KYC करण्याची सुविधा
– वडगाव बाजारपेठेतील रस्त्याच्या साईड ब्लॉक कामाला नगरपंचायतीचाच अडथळा? व्यापारी – ग्राहकांना नाहक त्रास
– अपघात ब्रेकिंग! तळेगाव दाभाडे शहराजवळ काळोखे पेट्रोलपंप इथे भीषण अपघात, अनोळखी वाटसरूचा जागीच मृत्यू