वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून अपूर्ण राहिलेल्या कामामुळे प्रमुख बाजारपेठ रोड च्या दोन्ही बाजूकडील पादचारी मार्ग ( पेव्हिंग ब्लॅाक) बसविण्यातच्या कामात अडथळा निर्माण होत असल्यामुळे वडगाव शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्याधिकारी प्रविण निकम यांना निवेदन देण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या वडगाव शहरात व्यापारानिमित्त जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, लहान मुले दुकानांत येत असताना मागील दीड वर्षांपासून सुरु असलेले रोडॉचे काम कुठेतरी पूर्णत्वास जात असताना साईडला ब्लॉक बसविण्याच्या ठिकाणी खड्डे पडलेले असून, पावसाचे पाणी साठल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. साचलेल्या पाण्यावर डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊन त्याची साथ वाढू शकते, त्याची गंभीरपणे दखल घेवून काम त्वरीत पूर्ण करावे अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. ( BJP letter to Nagar Panchayat CEO regarding pending road work in Vadgaon Maval City )
याप्रसंगी वडगाव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे , सरचिटणीस अतुल म्हाळसकर, नगरसेवक प्रविण चव्हाण, नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, मा नगरसेवक प्रसाद पिंगळे, मा प्र सरपंच संभाजी म्हाळसकर, चेतन बाफना, कुलदिप ढोरे, दीपक भालेराव, समिर गुरव, गणेश भिलारे आदि उपस्थित होते.
फोटो (नगरपंचायतचे अंडरग्राउंड इलेक्ट्रिशनच्या केबल टाकायच्या राहिलेल्या कामामुळे रस्त्याचे काम बंद)
अधिक वाचा –
– वडगावमधील भाजपच्या पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजनेचे अर्ज भरणे आणि E-KYC करण्याची सुविधा
– पवन मावळ भागात आधुनिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात, वारू गावातील शेतकऱ्यांची चारसूत्री पद्धतीला पसंती