तळेगाव दाभाडे : नाकात कर्करोगाची गाठ असलेल्या तसेच नाकाचा कर्करोग जो डोळे आणि मेंदु च्या आस पास पसरला होता अशा राजस्थानमधील ३६ वर्षीय रूग्णावर तळेगाव येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये टोमोथेरपीद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले आहे. टी.जी.एच. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राजीव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने रुग्णाला टोमोथेरेपी द्वारे यशस्वी रेडीएशन दिले गेले. कर्करोगानं पिडीत रूग्णाला नवीन आयुष्य मिळाले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राजस्थानमध्ये राहणाऱ्या ३६ वर्षीय रुग्णाला दोन वर्षांपूर्वी त्याच्या नाकाच्या वरच्या भागात ट्यमूर झाला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांना राजस्थानमध्ये रेडिएशन थेरपी देण्यात आली. परंतु, दीड वर्षांनंतर हा ट्यूमर पुन्हा विकसित झाला. यावेळी ट्यूमर डोळ्याच्या क्षेत्राभोवती असलेल्या पुढच्या सायनसमध्ये पसरला होता. त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु शस्त्रक्रियेद्वारे ही कॅन्सरची गाठ पूर्णतः काढण्यात आली नाही. कारण तो मेंदूला आणि डोळ्याभोवती आणि त्याच्या मुख्य मज्जातंतूला चिटकलेली होती. त्याला दुसऱ्यांदा रेडिएशन थेरपी देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु, मेंदू आणि डोळ्यात काही मिमी अंतर असल्याने रेडिएशन देणं खूप अवघड होते. त्यामुळे डोळ्याला इजा होण्याची शक्यता होती. रूग्णाने अनेक डॉक्टरांना दाखवले परंतु, काहीच फायदा झाला नाही. अखेरीस रूग्ण तळेगाव येथील टी जी एच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये उपचारासाठी आला. याठिकाणी रूग्णावर एआय आधारित टोमोथेरपीद्वारे डोळ्याला आणि मेंदूला इजा न पोहोचवता रूग्णावर उपचार करण्यात आले आहे. ( 36 year old man was successfully treated with tomotherapy at TGH Onco Life Cancer Center in Talegaon )
तळेगाव येथील टी.जी.एच. ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑकोलॉजिस्ट डॉ. राजीव श्रीवास्तव म्हणाले की, कॅन्सर रुग्णांसाठी टोमोथेरपी वरदान ठरली आहे. हे कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरले जाते. कर्करोग हे जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. या रूग्णाच्या नाकात वरच्या बाजूला कॅन्सरची गाठ होती. अनेकदा डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले. रेडिएशन थेरपीद्वारे ही गाठ काढण्यात आली होती. परंतु, काही वर्षांनी ही गाठ पुन्हा तयार झाली. ही गाठ मेंदू आणि डोळ्याच्या अगदी जवळ असल्याने रेडिएशन देणं अवघड होते. यामुळे रूग्णाच्या डोळ्याला इजा होण्याचा धोका होता. अशा स्थितीत आम्ही हे आव्हान स्विकारले आणि टोमोथेरपीद्वारे उपचार करून या रूग्णाच्या नाकातील कॅन्सरची गाठ काढली. ही गाठ काढताना डोळ्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, याचीही काळजी घेतली होती. आता या रूग्णाची प्रकृती उत्तम असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– पवन मावळ भागात आधुनिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात, वारू गावातील शेतकऱ्यांची चारसूत्री पद्धतीला पसंती
– किशोर आवारे हत्या प्रकरण : कोर्टाकडून आरोपी भानू खळदे ह्याला ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कस्टडी । Kishor Aware Murder Case