जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे ( Kishor Aware Murder Case ) यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार असलेला आरोपी चंद्रभान उर्फ भानू खळदे ह्याला शनिवारी (दिनांक 8 जुलै) रोजी नाशकातून अटक करण्यात आली. रविवारी (दिनांक 9 जुलै) रोजी सकाळी त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, कोर्टाने आरोपी भानू खळदे ह्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ( Kishor Aware Murder Case Accused Bhanu Khalde sent to police custody for 5 days by Vadgaon Maval Court )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची (दिनांक 12 मे) रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर निर्घृण हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदे यासह 7 जणांना अटक केली. दरम्यान या हत्येत भानू खळदे सहभागी असल्याचे तपासात समोर आले, तेव्हा भानू खळदे हा हत्या झाल्यापासून फरार असल्याचे समजले. भानू खळदे याच्या मागावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पथक होते, त्याला शनिवारी (दिनांक 8 जुलै) रोजी नाशिक येथून अटक केल्यानंतर पोलिसांनी रविवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले. तेव्हा, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कोर्टाने भानू खळदे ह्याला 5 दिवसांची अर्थात गुरुवार, दिनांक 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक वाचा –
– कुंडमळा इथे वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला, लेकाच्या मृतदेहाला बघताच आईने फोडला टाहो
– मोठी बातमी! लोणावळा शहराजवळील खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू