लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा ( Lonavala ) यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांना ( Blood Donation Camp ) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिरात 253 जणांनी रक्तदान केले. याचबरोबर आयोजित केलेल्या नेत्र चिकित्सा शिबिरात 126 जणांची नेत्र तपासणी, दंत चिकित्सा शिबिरात 59 जणांची तर वैद्यकीय चिकित्सा शिबिरात 107 जणांची मोफत तपासणी करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पी. एम. ओसवाल, डॉ. लीना पॉन, डॉ. सुहास गोसावी, डॉ. निधी टाटिया, संजय ओसवाल, भवांशी ओसवाल, डॉ. नरेश पाटील, लायन क्लब लोणावळा-खंडाळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल लुंकड, रेमंड इराणी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी आधार ब्लड सेंटर, इएसजी नेत्र रुग्णालय यांच्या वतीने सेवा देण्यात आली. तर, रक्तदात्यांना लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा यांकडून 5 लाखांचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे. यावेळी रक्तदात्यांना भिंतीवरील घड्याळे भेट देण्यात आली. ( 253 bottles of blood collected in blood donation camp in Lonavala )
अधिक वाचा –
– ‘शिवदुर्ग मित्र’ला ‘स्टार ऑफ लोणावळा’ पुरस्कार
– लोणावळा पोलिस स्वयंसेवक दलाची स्थापना, तुम्हीही होऊ शकता स्वयंसेवक, अशी करा नोंदणी