कोट्यवधी भारतीयांचे लक्ष लागलेले अभियान अर्थात चंद्रयान 3 ( Chandrayaan 3 Mission ) , दिनांक 14 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण केलेल्या चांद्रयान-3 ने शनिवारी (दिनांक 15 जुलै) पृथ्वीभोवती आपली पहिली फेरी ( One Orbit Around Earth ) पूर्ण केली. त्यानंतर आता ते पुढच्या कक्षेत गेले असून, 42 हजार किलोमीटरहून अधिक उंचीवरील कक्षेत फिरत आहे. चांद्रयान 3 हे सुस्थितीत असल्याचे इस्रोने ( ISRO Chandrayaan ) स्पष्ट केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चांद्रयान-3 हे पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. 5 वेळा पृथ्वीभोवती ते फिरेल. प्रत्येक वेळी ते पुढच्या कक्षेत ढकलण्यात येईल. यानंतर सहाव्या फेरीवेळी ते थेट चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. या फेरीमध्ये ते पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण क्षेत्रापासून बाहेर जाईल. दिनांक 31 जुलैपर्यंत चांद्रयान-3 हे पृथ्वीपासून सुमारे 1 लाख किलोमीटर दूर पोहोचले असेल. त्यानंतर वैज्ञानिक त्याला चंद्रासाठी निश्चित केलेल्या सौरकक्षेमध्ये ढकलतील. या कक्षेत काही दिवस प्रवास केल्यानंतर ते चंद्राजवळ पोहोचेल. त्यानंतर पृथ्वीप्रमाणेच चंद्राभोवती देखील ते फेऱ्या मारेल. ( ISRO Chandrayaan 3 Mission Completes One Orbit Around Earth )
चंद्राच्या जवळ नेण्यासाठी पृथ्वीप्रमाणेच, मात्र उलट प्रक्रिया राबवण्यात येईल. यावेळी एक-एक टप्प्यामध्ये चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने आतल्या बाजूला ढकलण्यात येईल. यासाठी प्रोपल्शन सिस्टीमची मदत घेण्यात येईल. दिनांक 17 ऑगस्टच्या आसपास ही प्रोपल्शन सिस्टीम चांद्रयान-3 च्या लँडर आणि रोव्हरपासून वेगळी होईल. यानंतर लँडर हे चंद्रापासून 100 किलोमीटरच्या कक्षेत आणले जाईल.
चांद्रयान-2 हे लँडिंगच्या वेळीच अयशस्वी झाले होते. त्यातून धडा घेत चांद्रयान-3 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. विक्रम लँडरला चंद्रावर उतरण्यासाठी मागच्या मोहिमेवेळी केवळ 500 बाय 500 मीटर जागा निश्चित करण्यात आली होती. ही जागा आता वाढवून सुमारे 4 बाय 2.5 किलोमीटर एवढी ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिक वाचा –
– गुडन्यूज! येत्या 12 ऑगस्टला होणार पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण, चंद्रकांत पाटलांची माहिती
– म्हाडा आणि सिडकोत घरासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारकडून उत्पन्नाच्या मर्यादेत मोठी वाढ