आंदर मावळातील टाकवे बुद्रुक गावातील काँग्रेसचे दिवंगत नेते विठ्ठल गायकवाड यांचे चिरंजीव पवन विठ्ठल गायकवाड यांची काँग्रेस पक्षाच्या मावळ विधानसभा विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया चे पुणे शहर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष अभिजित गोरे-देशमुख यांनी पवन गायकवाड यांची नियुक्ती जाहीर केली. ( Pawan Gaikwad Appointed As President Of Maval Vidhan Sabha Students Congress NSUI )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि आमदार संग्राम थोपटे तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या मान्यतेने ‘पवन विठ्ठल गायकवाड’ यांची मावळ विधानसभा विद्यार्थी काँग्रेस (NSUI) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या विचारांनुसार पुढील काळात विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासात भरीव कार्य करण्याची आणि पक्ष संघटना मजबुतीने उभी करण्याची अपेक्षा पवन गायकवाड यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. ( Pawan Gaikwad Appointed As President Of Maval Vidhan Sabha Students Congress NSUI )
भोर-वेल्हा-मुळशी तालुक्याचे विद्यमान आमदार आणि पुणे जिल्हा काँग्रेसचे नेते आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तसेच पुरंदरचे आमदार संजय जगताप, काँग्रेसचे जेष्ठ नेते चंद्रकांत सातकर, मावळ तालुका काँगेस अध्यक्ष यशवंत मोहोळ, काँग्रेसचे जेष्ठ नेते उद्योजक रामदास काकडे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, मावळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, एड. दिलीप ढमाले, रोहिदास वाळुंज, गणेश काजळे, एड खंडू तिकोणे, मावळ महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा हिरे, राजू शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुकमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षांनी अनुभवले शाळेतील “ते” दिवस…
– शिवदुर्ग मित्रला राज्यातील पहिला ‘माऊंटन सर्च आणि रेस्क्यू टीम ऑफ दी इयर’ पुरस्कार प्रदान