तळेगाव स्टेशन युवक काँग्रेसचे आय कमिटीच्या अध्यक्षपदी समीर दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे. समीर दाभाडे तळेगाव स्टेशन मधील युवक संघटनेतील चळवळीतील कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहून तसेच युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे यावेळी समीर दाभाडे यांनी प्रतिपादन केले. ( Sameer Dabhade Appointed as President of Talegaon Station Youth Congress )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
समीर दाभाडे यांना तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले आणि मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले, तालुका कार्याध्यक्ष ॲड खंडू तिकोणे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत आदी मान्यवर उपस्थित होते.
मावळ तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे धोरण असून विविध संघटनांची बांधणी करण्याचे काम जोरात सुरू असल्याचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांनी मार्गदर्शन केले.
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुकमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षांनी अनुभवले शाळेतील “ते” दिवस…
– शिवदुर्ग मित्रला राज्यातील पहिला ‘माऊंटन सर्च आणि रेस्क्यू टीम ऑफ दी इयर’ पुरस्कार प्रदान