रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने ( Raigad Irshalwadi Landslide ) झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झालाय आणि या घटनेने संपूर्ण राज्याला धक्का बसलाय. रात्रीपासूनच या ठिकाणी बचावकार्य सुरु असून आतापर्यंत 16 जणांच्या मृत्यूची तर 100 हून अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या डोंगररांगात घाटमाथ्यावर असलेल्या मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. ( Raigad Irshalwadi Landslide Many Villages In Maval Taluka Have Been Alerted )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हटलेत खासदार बारणे?
इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदार संघातील अशाच दरडप्रवण भागांबाबत प्रशासनाला पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी “मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ तालुक्यामध्ये काही ठिकाणी दुर्गम भाग आहे. छोटी मोठी अनेक धरणे आहे. डोंगराच्या कडेला अनेक छोटी मोठी गावे, जसे कि मोरमारेवाडी, कुसवली, शिलाटणे, गभालेवाडी, माऊ, वडेश्वर, पाले (ना. मा ), तुंग, घारेवस्ती, इ. गावे माळीण सारखी तालुक्यात वसलेली आहे. या गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका संभवतो आहे.”
तसेच, “धरण भागात व नदी लगत गावांना जोरदार पावसामुळे रस्ते जलमय होऊ शकतात, सखल भागात पाणी साचू शकते. तरी आपत्ती व्यवस्थापन (एन.डी.आर.एफ.) ची टीम मावळमध्ये सज्ज ठेवावी, तसेच दुर्गम भागातील स्थानिक आरोग्य विभाग व तलाठी ग्रामसेवक इतर संबंधित अधिकारी पोलीस प्रशासन यांना मुसळधार पाऊस सुरु असल्यास सदर त्यांच्या कार्यभागातच राहण्याच्या सूचना कराव्यात. तसेच इतर समाजउपयोगी संस्था यांना याबाबत कुठे काही आपत्ती येत असेल तर मदत कार्यासाठी आताच सूचना करण्यात याव्यात.”
“धरण भागातील गावांना त्या पाठबंधारे विभाग व टाटा विभाग धरण प्रशासन यांना सतत गस्त घालणे, सतर्कतेचा इशारा द्यावा यासाठी सूचना कराव्यात. तसेच मावळ मध्ये शेतकरी भात लागवड करत असून कृषि विभाग मार्फत या बाबत सुरक्षा पूर्वक सूचना करण्यात याव्या, तसेच अनेक शाळकरी विद्यार्थी हे अनेक किलोमीटरने प्रवास करुन शाळेत जात आहेत, ज्या भागात धोकादायक पावसातील प्रवास असेल अशा ठिकाणच्या शाळेला शिक्षण विभाग मार्फत सुट्टी आवश्यक असेल तर निर्णय बाबत सूचना कराव्यात, तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणावर मावळात येत असतात, त्यांना सुरक्षा पूर्वक सूचना परीपत्रक जाहीर करावे,” याबाबत उपाययोजना करण्याबाबत खासदार बारणे यांनी पत्र लिहिले आहे.
अधिक वाचा –
– Raigad Landslide । मोठी दुर्घटना! रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली, 35 ते 40 घरे मलब्याखाली
– किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरण : पीडित महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे – डॉ. नीलम गोऱ्हे